How to create Ram Navami Ghibli-style images using ChatGPT: हिंदू धर्मात राम नवमीला खुप महत्व आहे. यंदा राम नवमी ६ एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. राम नवमीच्या दिवशी भगवान श्री रामाची मनोबावे पूजा केल्यास सर्व समस्या दूर होतात अशी मान्यता आहे. जर तुम्हाला यंदा राम नवमीच्या खास शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही जिमिनी, ग्रोचॅटजीपीटी, ग्रोक आणि जेमिनीच्या मदतीने राम नवमी थीम असलेले फोटो कसे तयार करायचे ते येथे जाणून घेऊया.
चॅटजीपीटी, ग्रोक आणि जेमिनीच्या मदतीने राम नवमीनिमित्त कसे फोटो बनवावे हे स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.
GeminiChatGPT आणि Grok वर दररोज मर्यादित घिबली स्टाईल फोटो मोफत तयार करता येतात. पण जिमिनीवर अमर्यादित फोटो तयार करता येतात.
जिमिनीवर रामनवमीच्या शुभेच्छांचा फोटो तयार करण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही. राम नवमीच्या शुभेच्छा तयार करण्यासाठी सर्वात आधी टेक्स्ट बारमध्ये राम नवमीच्या शुभेच्छा असे लिहा आणि राम,सीता आणि लक्ष्मण सोबत आहेत असे लिहा. तुम्हाला सुंदर तयार करून मिळेल. हे फोटो पाठवा आणि राम नवमीच्या शुभेच्छा द्या.
GrokGrok वापरून घिबली स्टाइल फोटो तयार करण्यासाठी सर्वात आधी तुमच्या लॅपटॉप किंवा फोनवर लॉग इन करा. नंतर डाव्या बाजूला दिसणाऱ्या क्लिप इमेजवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर, स्क्रीनवर फोटो अपलोड करण्याचा किंवा इंटरनेटवर आधीच असलेल्या फोटोची लिंक अपलोड करण्याचा पर्याय दिसेल. फोटो अपलोड केल्यानंतर, ग्रोकच्या टेक्स्ट बारमध्ये "Transform image studio ghibli art with happy ram navami' असे लिहा. तुम्हाला लगेच घिबली स्टाइल फोटो तयार मिळेल.
ChatGPTChatGPT वर फक्त दोन किंवा तीन फोटो मोफत तयार करता येतात. अशा वेळी जर तुम्ही chatGPT वर घिबली स्टाईल फोटो तयार करत असाल तर सर्वात पहिले रामाचा फोट डाउनलोड करून अपलोड करा आणि नंतर "Create Ghibali Style image with happy raam Navami wish" असे प्रॉम्प्ट लिहा. तुम्हाला लगेच घिबली फोटो तयार मिळेल.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.