Maharashtra News Live Updates : साकुर फाट्याजवळ भाविकांच्या ट्रॅव्हल बसला भीषण अपघात, १४ जण गंभीर जखमी
Saam TV April 05, 2025 09:45 PM
साकुर फाट्याजवळ भाविकांच्या ट्रॅव्हल बसला भीषण अपघात, १४ जण गंभीर जखमी

- नाशिकच्या साकुर फाट्याजवळ भाविकांच्या ट्रॅव्हल बसला भीषण अपघात.

- अपघातात ११ जण जखमी, तिघे गंभीर जखमी.

- जखमींवर एसएमबीटी रुग्णालयात उपचार सुरू.

- घाटकोपर येथून दर्शनासाठी शिर्डीला जाताना अपघात.

- मिनी ट्रॅव्हल बस आणि डंपरमध्ये झाला अपघात.

- अपघाताबाबत वाडीवर्हे पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू.

बंद पडलेल्या शिवशाहीला पोलिसांचा हात, काही काळ झाली वाहतूक कोंडी

पुण्यात वाहतूक पोलिसांनी लोटली शिवशाही.

चौकात असलेल्या ९ वाहतूक पोलिसांनी ढकलली शिवशाही.

पुण्यातील टिळक रस्त्यावरील प्रकार.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल.

बंद पडलेल्या शिवशाहीला पोलिसांचा हात.

टिळक रोडवरून स्वारगेटच्या बाजूने चालली होती शिवशाही.

शिवशाही बंद पडल्याने झाली होती वाहतूक कोंड.

महिलांचे अंतरवस्त्र चोरणाऱ्या मनोविकृता विरोधात महाडमध्ये तक्रार दाखल

महिलांवर अत्याचाराच्या वेगवेगळ्या घटना समोर येत असताना महिलांचे अंतरवस्त्र चोरले जाण्याची घटना महाडमध्ये समोर आली आहे.

या प्रकरणी महाड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. निलेश ऐनकर वय वर्ष 38 असे अरोपीताचे नाव असून त्याच हे किळसवाण कृत्य CCTV मध्ये कैद झाले आहे.

सदर आरोपी परिसरात फिरून दोरीवर वाळत घातलेले महिलांचे वापरते अंतरवस्त्र चोरी करीत असे.

बंद मोडक्या घरात त्याने ते साठवुन ठेवल्याचे देखील समोर आले आहे. गेल्या काही महिन्यां पासून वाळत घातलेले महिलांचे अंतरवस्त्र बेपत्ता होत असल्याने याचा शोध घेतला जात होता. दरम्यान CCTV मध्ये कपडे चोरीची घटन कैद झाल्याने खुलासा झाला.

साकीनाका येथील सेंट ज्यूडस शाळेजवळ वखारीला आग, सिलेंडरचे ब्लास्ट झाल्याची माहिती

साकीनाका येथील सेंट ज्यूडस शाळेजवळ वखारीला आग लागल्याची माहिती

घटना स्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वर्चस्वाला महाविकास आघाडी सुरुंग लावणार?

धाराशिव जिल्ह्यात आज जिल्हा मजूर सहकारी फेडरेशनचे मतदान पार पडत आहे.जिल्ह्यात एकूण आठ मतदान केंद्रावरती ही मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

मजूर फॅडरेशनचे जिल्ह्यात एकून 345 मतदार आहेत.एकून 13 जागेसाठी ही मतदान प्रक्रीया सुरु आहे.

तेरापैकी चार जागा बिनविरोध निवडल्या असून बाकी नऊ जागांसाठी 24 उमेदवार रिंगणात आहेत.

भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच वर्चस्व या मजूर फॅडरेशन वरती राहीलेले आहे. आज मतदान पार पडल्यावर लगेच उद्या याचा निकाल जाहीर होणार आहे

एकंदरीतच उद्या निकाल लागल्यानंतर जिल्हा मजूर फेडरेशन वरती महायुती किंवा महाविकास आघाडी यापैकी कोणाच वर्चस्व निर्माण होतं हे पाहणं गरजेचं आहे.

लातूरमध्ये जीर्ण झालेल्या इमारतीचा छत कोसळा; मोठा अनर्थ टळला, मात्र वाहनांचे नुकसान

लातूर शहरातल्या गंजगोलाई परिसरात उभी असलेल्या एका जीर्ण इमारतीचा छताचा भाग कोसळला आहे...

शहरातल्या मुख्य बाजारपेठेत असलेली ही जीर्ण इमारत आहे...

आज सकाळी अचानक इमारतीचा छताचा भाग कोसळला., यात खाली उभे असलेल्या ऑटो आणि दोन दुचाकीनवर इमारतीचा भाग कोसळल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र कुठलीही जीवित हानी झाली नाही, तर मोठा अनर्थ टळला आहे...

यापूर्वी देखील जीर्ण इमारती पाडण्याबाबतच्या नोटिसा मानपाणि दिल्या होत्या मात्र कुठलीही कारवाई झाली नाही..

त्यामुळे मनपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत...

नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीठीत 378 हेक्टर क्षेत्रात नुकसान

नंदुरबार तालुक्यातील गंगापूर आणि ठाणेपाडा परिसरात सर्वाधिक कांदा आणि मका पिकांचे नुकसान......

वादळी वाऱ्यामुळे या परिसरातील 20 घरांची प्रचंड नुकसान.....

गुरांसाठी साठवून ठेवलेला चारा भिजल्याने येणाऱ्या काळात तीव्र चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता....

नुकसान भरपाई तातडीने मिळावी शेतकऱ्यांची अपेक्षा.....

काल नांदेडच्या आलेगाव शिवारात विहिरीत पडून सात महिला मजुरांचा मृत्यू

नांदेड काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी वसमत तालुक्यातील गुंज येथे येऊन पीडित कुटुंबियांचे केले सांत्वन.

पीडित कुटुंबियांनी रवींद्र चव्हाण यांना सांगितला घटनाक्रम.

व्यथा मांडतांना नातेवाईकाच्या डोळ्यातील अश्रुवानावर.

गुंज वस्तीवर सुविधा देण्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करू

खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिला नातेवाईकाला धीर.

चांदवडला मनसेतर्फे कर्जमाफीसाठी आंदोलन आंदोलन

नाशिकच्या चांदवड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कर्जमाफी व पिक विमा मिळवा या मागणीसाठी चांदवड येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळेस मनसेचे नितीन थोरे व मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले आले.

Dharashiv: महाविद्यालयात निरोप समारंभाच्या कार्यक्रमात भाषण करत असतानाच विद्यार्थ्यांनीला आली भोवळ

विद्यार्थीनीला दवाखान्यात दाखल केल्यानंतर झाला मृत्यू

परंडा शहरातील रा.गे शिंदे महाविद्यालयातील घटना -विद्यार्थीनी भाषण कसत असतानाच खाली कोसळली

वर्षा खरात असं मृत्यू झालेल्या विद्यार्थीनीच नांव

बिएसी च्या वर्गातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रमात घडला प्रकार

Pen: पेण मधील वादळामुळे गणपती कारखान्यांचे नुकसान

काल (शुक्रवारी ) संध्याकाळी रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामध्ये गणपती कारखान्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

वादळादरम्यान गणपती कारखान्यावरील पत्रे उडाल्यामुळे कारखान्याच त्याच बरोबर मुर्ती बिझल्यामुळे मुर्तींच अस दुहेरी फटका गणपती कारखानदारांना बसला आहे.

वादळ आणि पावसादरम्यान उडालेल्या पत्र्याच्या जागी प्लास्टिक लावण त्याच बरोबर गणपती मुर्ती सुरक्षित ठिकाणी हलवण अशी धावपळ कारखानदारांची उडाली होती.

अवकाळी पावसाने बीडच्या खालापूर येथील राहुल मुंडे नामक शेतकऱ्याचे दोन एकर टोमॅटो पीक जमीन उद्ध्वस्त

राज्यामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे याचा फटका बीड जिल्ह्याला देखील बसला आहे बीडच्या खालापुरी गावातील शेतकरी राहुल मुंडे यांनी आपल्या शेतामध्ये दोन एकर टोमॅटो नगदी पीक आपल्या शेतामध्ये पिकवले होते मात्र हाता तोंडाशी आलेलं टोमॅटो चा प्लॉट अवकाळी पावसाने जमिनी उद्ध्वस्त झालं आहे यामध्ये शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे. नुकसान भरपाई मिळावी शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी नुकसानीमुळे शेतकऱ्यावर बोंबलण्याची आली वेळ.

Beed News: आष्टी अहिल्यानगर महामार्गावर स्कूलबसचा अपघात; चालकासह विद्यार्थी जखमी

बीडच्या आष्टी येथे स्कूल बसचा अपघात झाला. या अपघातात एका झाडाला ही स्कूल बस धडकली आहे. यात वाहन चालकासह काही विद्यार्थी जखमी आहेत.

आष्टी अहिल्यानगर महामार्गावरील बेलगाव चौकात हा अपघात झाला.

अपघाताचे कारण नेमके समजू शकले नसून स्थानिकांनी वेळीच मदत केल्याने जखमींना मदत झाली आहे.

अपघातातील जखमींवर आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेच्या आधारावर पोलीस अपघाताचे कारण शोधत आहेत.

दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर अखंड मराठा समाजाचे आंदोलन

- ⁠रुग्णालय प्रशासनाविरोधात आंदोलन

- ⁠रुग्णालय प्रशासनविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी

- ⁠गर्भवती महीलेचा उपचारा अभावी मृत्यू झाल्याच्या विरोधात आंदोलन 

सातारा औद्योगिक वसाहतीत मंत्र्यांच्या स्वागतासाठी खोट्या नोटांचा उधळल्या

साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीत काल झालेल्या एका कार्यक्रमात उद्योगमंत्र्यांच्या स्वागतासाठी खोट्या नोटांचा पाऊस पाडण्यात आला.

उदय सामंत यांच्या स्वागता साठी जे रंगीत कागदांचा फटाक्यांच्या ब्लास्ट करण्यात आला त्यामध्ये या खोट्या नोटांचा वापर करण्यात आला होता.

या नोटांवर महात्मा गांधी आणि बौद्ध स्तूपाचे चित्र आहे.या घटनेमुळे सामाजिक स्तरावर नाराजी व्यक्त केली जाते आहे.

साताऱ्यातील नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक अधिकारी कार्यालय नूतनीकरण व लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम मंत्री उदय सामंत आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थित घेण्यात आला होता.

यावेळी उदय सामंत यांच्या स्वागतासाठी रंगबेरंगी कागदासह व साची स्तूपाची चित्र असलेल्या दोनशे रुपयांच्या भारतीय बच्चो का बँक असे छापलेल्या नोटा उडवण्यात आल्या.

सदर नोटा स्वागतानंतर जमिनीवर पडल्या होत्या. यामुळे युगपुरुषांचा अवमान झाल्याची भावना व्यक्त होते आहे.

या पद्धतीने फटाक्यात बनावट नोटांचा वापर केल्याने या कार्यक्रमावर लोकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन

- दीनानाथ मंगेशकर रुग्णालया प्रशासना विरोधात राष्ट्रवादी आज करणार आंदोलन

- रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी काँग्रेस कडून करण्यात येणार आंदोलन

- गर्भवती महिलेचा उपचारांअभावी मृत्यू झाल्यानंतर पुण्यात अनेक पक्ष संघटनांकडून आंदोलन

- आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते रुग्णालय प्रशासनाला देणार निवेदन 

Bhiwandi: भिवंडी शहरातील पन्ना कंपाउंड परिसरात मोती कारखान्याला भीषण

या कारखान्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक मोती साठवण्यात आले होते

आगीचे कारण अजूनही अस्पष्ट असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थिचे प्रयत्न सुरू

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेरी रुग्णालयाच्या नावाचा बोर्ड रुग्णालय प्रशासनाकडून काढण्यात आला

- ⁠काल आंदोलकांनी रुग्णालयाच्या या नामफलकाला नकली नोटांचा हार घातला होता

- ⁠तसेच या बोर्डला काळे फासले होते. शाई देखील फेकण्यात आली होती

- ⁠त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालय प्रशासन रुग्णालयाच्या नावाचा बोर्ड काढून घेतला आहे

काँग्रेस माजी नगरसेवक आणि काँग्रेस राज्यमंत्री रमेश बागवे यांचे पुत्र अविनाश बागवे अजित पवार यांच्या भेटीला

पुण्यात सर्किट हाऊस येथे भेटीसाठी पोहचले

उमरगा येथील कर्नाटक- महाराष्ट्र सिमेवर असलेले वनविभागाचे कार्यालय रामभरोसे..?

धाराशिवच्या उमरगा येथील कर्नाटक - महाराष्ट्र सिमेवर असलेले वन विभागाचे कार्यालय रामभरोसे आहे का असा सवाल नागरीकांतुन उपस्थित केला जात आहे.

अधिकारी,कर्मचारी कार्यालयातून सातत्याने गायब असतात.

विचारणा केली तर अधिकारी व कर्मचारी साईट वर गेल्याचे सांगण्यात येते.गेल्या दोन महिन्यात या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी अनेकांनी बिबटया पहिल्याची चर्चा समाज माध्यमातून दिसून येते मात्र येथील वन विभाग काय कारवाई करते याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

दरम्यान कार्यालयात अधिकारी उपलब्ध नसतात असा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

लातूर जिल्ह्यात 382 हेक्टर वरील शेती पिकांना फटका, 722 शेतकऱ्यांच नुकसान

लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जिल्ह्यातील 382 हेक्टर वरील बागायती आणि जिरायती शेती पिकांचं नुकसान झाल आहे..

काल आणि परवा झालेल्या अवकाळी पावसामुळे 722 शेतकऱ्यांचं आता तोंडाशी आलेलं पीक लहरी निसर्गराने हिरावून घेतले आहे...

आंबा, गहू ,ज्वारी, हरभरा यासह इतर पिकांना देखील या अवकाळीचा फटका बसलाय...

नुकसान झालेल्या भागाची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी देखील पाहणी केली आहे...

तर आता बाधित शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या मदतीची अपेक्षा देखील व्यक्त केली आहे..

धाराशिव मध्ये मनसेचे अनोखे आंदोलन, शेतकऱ्याचे अवयव विक्रीस काढून मुख्यमंत्र्यांना निवेदन

धाराशिव मध्ये मनसेच्या वतीने एक लक्षवेधी आंदोलन करण्यात आलय कर्जबाजारीपणामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांची व्यथा मांडताना, समनसेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचे अवयव विक्रीस काढल्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.

मनसे पदाधिकारी गोपाळ घोगरे यांनी अंगावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे बॅनर लावत, "शेतकऱ्यांचे अवयव विकत घ्या"असा संदेश दिला.या आंदोलनात शेतकऱ्याच्या अवयवांना प्रतीकात्मक किंमतीही लावण्यात आल्या- किडनी 1 लाख, लिव्हर 75 हजार, तर डोळे 30 हजार रुपये अशी ही अस्वस्थ करणारी किंमत जाहीर करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या स्थितीकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याचा आरोप मनसेने केला आहे. निवडणुकीपूर्वी दिलेली कर्जमाफीची आश्वासने अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. एक रुपयातील पीक विमा योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी असून, शेतमालाला हमीभाव,दूध दरात सुधारणा यासह इतर मागण्यांकडे सरकारने लक्ष द्यावे,अशी जोरदार मागणी मनसेने या अनोख्या आंदोलनातून केलीय.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळासह 'अवकाळी'चा हंगामाला फटका

जळगाव वादळासह अवकाळी पावसाचा तीन तालुक्यांतील ६० गावांना फटका बसला आहे. अमळनेर, पारोळा व चोपडा तालुक्यांत पिकांसह फळझाडांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, शुक्रवारपासून प्रशासनाने पंचनाम्यांना सुरुवात केली आहे.या अवकाळी संकटात गहू, मका, ज्वारी, बाजरी, कांदा, केळी आणि फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भुसावळ तालुक्यातही काही गावांना फटका बसला आहे.मात्र, पालेभाज्यांसह फळपिकांना मोठा फटका बसला आहे. पपईसह काही प्रमाणात लिंबू बागांचेही नुकसान झाले आहे.हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, या तीन तालुक्यांतील काही भागात अवकाळी पाऊस झाला तर गुरुवारी रात्री वादळाने पिके आडवी पडली

आई एकविरा देवीचा उदो उदो... कार्ला गडावर आई एकविरा देवीचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न...

महाराष्ट्रातील लाखो कोळी, आगरी बांधव यासह खोट्यावधी नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला येथील एकविरा देवीचा पालखी सोहळा चैत्रशुद्ध सप्तमीला मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाला. पालखी सोहळ्याच्या दिवशी मावळात अवकाळी पावसाने आगमन झाले होते. त्यामुळे काही वेळ भाविकांची तारांबळ उडाली होती. मात्र सायंकाळी पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. गुढीपाडव्यापासून देवीच्या चैत्र यात्रेला सुरुवात झाली होती. पालखी सोहळ्यासाठी कोकण विभागातून, पेण,, मुंबई, ठाणे, रायगड,या सह महाराष्ट्रातून लाखो भाविक गडावर आले होते. एकविरा देवी ही कोळी व आगरी बांधवांची कुलदैवत असल्याने कोकण भागातून अनेक पालख्या यावेळी गडावर आल्या होत्या..

शिर्डीत तिन दिवसीय रामनवमी उत्सवाला भक्तीमय वातावरणात सुरुवात

शिर्डीत तिन दिवसीय रामनवमी उत्सवाला भक्तीमय वातावरणात सुरुवात झालीये.. पहाटेच्या काकड आरतीनंतर साई बाबांची प्रतिमा, विणा आणि पोथीची मिरवणुक काढून उत्सवाला प्रारंभ करण्यात आला.. साईबाबांनी त्यांच्या हयातीत सुरू केलेल्या उत्सवाचे यंदा 114 वे वर्ष असुन मोठ्या संख्येने भाविक पायी पालख्या घेऊन शिर्डीत दाखल होताय... सौदी अरेबिया येथील देणगीदार साईभक्ताकडून साईमंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलीये.. उत्सवाच्या मुख्य दिवशी म्हणजेच उद्या साईमंदिर भक्तांना दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार आहे..

नांदेड अपघातस कारणीभूत ठरलेल्या ट्रॅक्टर चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

काल नांदेडच्या आलेगाव शिवारात ट्रॅक्टर विहिरीत पडून सात महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र यातील ट्रॅक्टर चालक नागेश आवटे चालत्या ट्रॅक्टर मधून उडी घेऊन फरार झाला होता. फरार होताना त्याने मेंढपाळाला ट्रॅक्टर विहिरीत पडले त्यात महिला आहेत अशी माहिती दिल्याचे पुढे आले आहे. नांदेड पोलिसांनी रात्री उशिरा ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात निबंगाव पोलीस ठाण्यात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅक्टर चालक अल्पवयीन असल्याच्या चर्चा होत्या मात्र आता आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर तो अल्पवयीन नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पाण्यासाठी शेकडो महिला धडकल्या ग्रामपंचायती कार्यालयावर..

सिंदखेडराजा तालुक्यातील वाघजाई गावांत भिषण पाणी टंचाई झाली आहे.. गावात राष्ट्रीय पेय जल योजना राबिविली आहे मात्र ती योजना अर्धवट काम करून संबधित ठेकेदाराने पूर्ण बिल काढून ते काम सोडून पळून गेला आहे ही योजना पाच वर्षाअगोदर राबविली मात्र ग्रामस्थांना पाणी मिळालेच नाही पाण्यासाठी दर् उन्हाळ्यात दूरवर महिलांना पायपीट करावी लागत आहे.. पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे जिल्हाधिकाऱ्यांना कित्येक वेळा निवेदने दिली आंदोलने केली मात्र थातूर मातूर उत्तरे दिली जात असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे.. वैतागून शेकडो महिलांनी ग्रामपंचायंतीवर हंडा मोर्चा काढला.. पाणी द्या अशी मागणी करण्यात आली आक्रमक झालेल्या महिला पाहून ग्रामसेवक पळून गेला होता... आता हा हंडा मोर्चा जिल्हाधिकारी कार्याल्यावर काढणार असल्याचे महिलांनी सांगितले आहे....

दोन दिवस अवकाळी ने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा..

जिल्ह्यात दोन दिवस वादळी अवकाळी पावसाने असंख्य शेतकऱ्यांच्या फळ बागा उध्वस्त केल्यात तर कांदा मका पिकांचे मोठे नुकसान झाले , जिल्ह्यातील 166 या अवकाळीचा फटका बसला असून 5 हजार हेक्टरवरील् पिकांचा नुकसान झाले आहे..

यामध्ये मोठ आर्थिक नुकसान झाले आहे .. अद्याप पर्यंत जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे आदेश दिल्या गेले नाहीत म्हणून उबाठाचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे... अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे..

भंडाऱ्याच्या तुमसरात आयपीएल क्रिकेटच्या दोन जुगार अड्ड्यावर पोलिसांचे छापे.

भंडाऱ्याच्या तुमसर इथं सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेटच्या दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या जुगार अड्ड्यावर तुमसर पोलिसांनी छापेमारी केली. यात नऊ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर, फरार सहा जुगार खेळणाऱ्यांचा तुमसर पोलीस शोध घेत आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेल्या या छापेमारीत तुमसर पोलिसांनी ६ मोबाईल आणि जुगार साहित्य असा ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भंडाऱ्यात दुपारी एका अड्ड्यावर कारवाई करताना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर तुमसरात दोन....अशा एकाचं दिवशी आयपीएलच्या क्रिकेट मॅचवर जुगार खेळणाऱ्या तीन अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली.

राज्यातील एचएसआरपी नंबर प्लेटच्या दरांना नागपूर खंडपीठात आवाहन

- शेजारील इतर राज्यात नंबर प्लेटचा दर कमी असताना महाराष्ट्रात सर्वाधिक दर का?

- असा प्रश्न उपस्थित करणारी जनहित याचिका नागपूर खंडपीठात दाखल झाली असून परिवहन आयुक्तांना तीन आठवडयात जवाब नोंदविण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे

- याचिकेत नंबर प्लेटचा दर अधिक असल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसत असल्याचं केला दावा

पुणे शहरात समाविष्ट गावांसाठी ग्रामपंचायतीच्या दराने दुप्पट मिळकत कर आकारणी करावी

समाविष्ट गावांमधील नागरिकांची महापालिकेकडे मागणी महापालिकेत शुक्रवारी बैठक संपन्न

समाविष्ट ३२ गावांसाठी ग्रामपंचायतीच्या दराने दुप्पट मिळकत कर आकारण्यात यावा,हा मिळकत कर संबंधित गावांमधील नागरिकांकडून भरला जाईल, अशी मागणी समाविष्ट गावांच्या शुक्रवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत करण्यात आली.

महापालिकेने यासंदर्भात प्रश्न येत्या दोन महिन्यात सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे आश्वासन नागरिकांना दिले.

शहरामध्ये समाविष्ट झालेल्या ३२ गावांमधून महापालिकेच्या मिळकत कर विभागाकडून जाचक कर आकारणी केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला होता.

आता पुण्यातही फॉग कॅनॉन मशिनद्वारे प्रदूषण कमी करण्यावर दिला जाणार भर

दिल्ली, चंदीगड, पिंपरी-चिंचवड पाठोपाठ पुण्यात होणार प्रयोग, महापालिकेने खरेदी केल्या पाच फॉग कॅनॉन मशिन

दिल्ली, चंदीगड, पिंपरी चिंचवडच्या पाठोपाठ आता पुण्यातील रस्त्यांवरही हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी फॉग कॅनॉन मशिनद्वारे पाण्याची फवारणी केली जाणार आहे.

पाणी फवारणीमुळे हवेतील धुलीकणांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. त्यासाठी महापालिकेने पाच फॉग कॅनॉन मशिन खरेदी केल्या असून शहरातील पाच प्रमुख रस्त्यांवर त्याचा वापर केला जाणार आहे.

शंभर हेक्टर पर्यंत नुकसानीचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात येणार

पुणे जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे शंभर हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.यामध्ये प्रामुख्याने भाजीपाला, गहू यांसह फळबागांचे नुकसान झाले आहे.

नुकसान झालेल्या भागात तातडीने पंचनामे करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या जिल्हा अधीक्षक यांनी सांगितले. जिल्ह्यातील द्राक्ष बागांचा हंगाम जवळपास साठ टक्के संपला आहे, शेतात द्राक्ष आहेत.

Mumbai Fire News Update : ओशिवरा येथील मेघा मॉलमध्ये लागलेली आग विझवण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आग विझवली. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. आगीचे कारण तपासले जात आहे. मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न ४७६ महाविद्यालयांतील पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांना आजपासून सुरुवात

छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न ४७६ महाविद्यालयांतील पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांना आजपासून सुरुवात होत आहे. या परीक्षेसाठी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या ४७ हजार २३७ विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत परीक्षा अर्ज भरले नाहीत. तरीही परीक्षा विभागाने शेवटच्या दिवसापर्यंत लेट फी भरून परीक्षेसाठी मुभा दिली आहे. मात्र, ४७ हजार विद्यार्थ्यांनी पदवी परीक्षेकडे पाठ फिरवली का अशी चर्चा सुरू झालीय. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये जुन्या पॅटर्नचे २ लाख १२ हजार २९१ विद्यार्थी आहेत. त्यापैकी १ लाख ६८ हजार २९१ विद्यार्थ्यांनीच परीक्षेसाठी अर्ज, तर तब्बल ४४ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेकडे दुर्लक्ष केले, तसेच नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदवीच्या दुसऱ्या सत्राचे ७९ हजार ४०८ विद्यार्थी असून, त्यापैकी ७६ हजार २४१ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज केला. त्यामुळे एकूण २ लाख ९१ हजार ६९९ विद्यार्थ्यांपैकी ४७ हजार २३७ विद्यार्थ्यांनी चक्क परीक्षा अर्जच भरला नाही. ज्यांनी अर्ज केले, त्यांचे हॉलतिकीट संबंधितांच्या लॉगिनमध्ये असून, तेच हॉलतिकीट महाविद्यालयांच्या लॉगिनमध्येही उपलब्ध करून दिल्याचे संचालक डॉ. गवळी यांनी स्पष्ट केले. अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांना शेवटच्या क्षणापर्यंत विलंब शुल्क भरून संधी दिली होती. त्यामुळे ४७ हजारांच्या आकड्यांमध्ये बदलही होईल अशी अपेक्षा विद्यापीठ प्रशासनाला आहे.

Rain News : गारपिटीमुळे ८७१ हेक्टर पिकांचे नुकसान

गेल्या तीन दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ८७१ हेक्टर पिकांचे नुकसान झालंय. छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड आणि लातूर या चार जिल्ह्यांसह उर्वरित चार जिल्ह्यांना कमी प्रमाणात अवकाळीने दणका दिला. वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसाने ५३ गावांतील १ हजार ५९४ शेतकऱ्यांच्या ८७१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले आहे. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त प्रशासनाने नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश सर्व जिल्ह्यांना दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १४, परभणीतील १, बीडमधील १, लातूर ३७ अशा ५३ गावांमध्ये अवकाळीने थैमान घातले. बीडमध्ये १ जणाचा वीज पडून मृत्यू झाला. लहान-मोठी मिळून १५ जनावरे दगावली. छत्रपती संभाजीनगरमधील ६८८ हेक्टर, परभणीतील ३.२, बीडमधील ०.९० हेक्टर, तर लातूरमधील १७८, असे ८७१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिरायत २२७.६ हेक्टर, तर बागायत ५६६.६ व ७७.५ हेक्टरवरील फळपिकांना अवकाळीमुळे फटका बसला.

Solapur Live News : बार्शी शहरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

बार्शी शहरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

बार्शी शहरातील प्रमुख भागात अवकाळी पावसाची तुफान बॅटिंग

मागच्या दोन दिवसांपासून बार्शी तालुक्यात अवकाळी पावसाची सुरूय बरसात

उकड्याने हैराण झालेल्या बार्शीकरांना या पावसामुळे मिळाला दिलासा

तर अचानक आलेल्या पावसामुळे बागायतदार शेतकऱ्यांच्या चिंतेत पडली भर

Thane Crime : डोंबिवली येथील दोन गुन्ह्यात पाहिजे असलेल्या सुरेंद्र पाटील याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने नाशिक येथून अटक केली असून मानपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.नुकताच पाटीलवर मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता Rain News : अवकाळी पावसामुळे विटभट्टी व्यवसाईकांचे नुकसान

आंबा, काजूच्या पिका प्रमाणेच अवकाळी पावसामुळे विटभट्टीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वाढत्या शहरी करणामुळे बांधकामासाठी विटांना मोठी मागणी आहे. उन्हाळ्याच्या चार महिन्यांमध्ये केल्या जाणाऱ्या या विट भट्टी व्यवसायाला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसतो आहे. मातीवर वेगवेगळी प्रक्रीया करुन मऊ केलेल्या मातीपासुन कच्च्याविटा तयार केल्या जातात. या कच्च्या विटांना चांगले सुकवणे आणि नंतर चांगले भाजणे गरजेचे असते मात्र कच्च्याविटा सुकवण्याच्या आणि भाजण्याच्या काळात अवकाळी पाऊस पडत असल्याने विटभट्टी व्यवसायीकांचे नुकसान होत आहे. पावसाच्या थंबामुळे सुकवण्यासाठी ठेवलेल्या विटांचा आकार बदलतो, विटेवरील डिझाईन भरून जाते, कडा आणि कोपरे खराब होतात तर लावलेल्या भट्टीवर पाऊस पडल्याने भट्टी विझुन देखील विटभट्टीचे नुकसान होत आहे. शेती प्रमाणेच विटभट्टीच्या नुकसानीला शासनाने मदत करावी अशी मागणी रायगडमधील विटभट्टी व्यवसायीक करीत आहेत.

Pune Crime : पुण्यात सैन्यदलातील जवानाच्या घरातून दागिने चोरी,आरोपीकडून १६ तोळे सोने जप्त

सैन्य दलातील फरार शिपाईच निघाला चोर

सैन्य दलातील जवानाच्या घरातून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीला वानवडी पोलिसांनी साताऱ्यातून अटक केली.

पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून १३ लाख ७७ हजार रुपये किमतीचे १६ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले.

Pune News : दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रकरण

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रकरण

दोन दिवस झाले तरी पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल नाही

मंगेशकर रुग्णालय व्यवस्थापनाचा जबाब पोलिस नोंदवण्यासाठी उशीर लावत आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय.

राज्याच्या वैद्यकीय समिती सह धर्मदाय आयुक्तांसह ४ जणांच्या समिती कडून तपास झाल्यानंतर पोलिस जबाब नोंदवणार असल्याचं पोलिस सांगत आहे.

अनेक सामाजिक राजकीय संघटनांनी काल दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल विरोधात आंदोलन मोर्चे काढले कारवाईची मागणी केलीय.

मात्र अजूनही गुन्हा दाखल नाही किंवा कुठलीही हॉस्पिटलवर प्रशासनावर कुठलीही कारवाई नाही.

Maharashtra News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात

पुण्यात वेगवेगळ्या तीन कार्यक्रमांना लावणार हजेरी

दुपारी अडीच वाजता बालेवाडी येथे महसूल विभागाच्या कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमाला फडणवीस राहणार हजर

तर दुपारी साडे चार वाजता सखी गीतरामायण आणि राम सीता स्वयंवर कार्यक्रमाला गणेश कला क्रीडा रंगमंच येथे उपस्थितीत राहणार

तर सायंकाळी साडे पाच वाजता एडवोकेट एस के जैन यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाला सी ओ ई पी मैदानावर राहणार उपस्थितीत

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.