कुंभमेळ्याबाबत केलेल्या विधानानंतर आता राज ठाकरेंवर बंदी घालण्याची मागणी केली जाते आहे. महंत अनिकेत शास्त्री यांनी ही मागणी केली आहे.
श्रीलंका सरकारच्या 'मित्र विभूषण' पदकाने सन्मानित होणे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदीश्रीलंका सरकारच्या 'मित्र विभूषण' पदकाने सन्मानित होणे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहे.
Nashik Live : चांदवडमध्ये मनसेतर्फे कर्जमाफीसाठी आंदोलननाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कर्जमाफी आणि पिक विमा मिळवण्यासाठी चांदवड तहसील कार्यालयावर मोर्चा काढला गेला. या वेळी मनसेचे नितीन थोरे आणि मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते. तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
Live : काल नांदेडच्या आलेगाव शिवारात सात महिला मजुरांचा विहिरीत पडून मृत्यू झालाकाल नांदेडच्या आलेगाव शिवारात एक दुर्दैवी घटना घडली, ज्यात सात महिला मजुरांचा विहिरीत पडून मृत्यू झाला.
काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी वसमत तालुक्यातील गुंज गावात जाऊन पीडित कुटुंबीयांना सांत्वन दिले."
पीडित कुटुंबीयांनी रवींद्र चव्हाण यांना घटनाची माहिती दिली.
नातेवाईकांची व्यथा मांडताना त्यांच्याच डोळ्यात अश्रू दिसत होते.
गुंज वस्तीवर आवश्यक सुविधा मिळवण्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करू.
खासदार रवींद्र चव्हाण यांनी दुःखद कुटुंबीयांना धीर दिला.
Nashik Live : कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा शेतकऱ्यांना सुनावतानाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरलकृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शेतकरी कर्जमाफीवरून कोकटेंनी शेतकऱ्यांनाच सुनावलं आहे. सरकार पैसा शेतीत भांडवलीसाठी देते, साखरपुडा, लग्न करण्यासाठी नाही. कोकटेंच्या याच विधानावरून रोहित पवारांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
Nagpur Live : रामनवमीनिमित्त नागपूर सज्ज; दंगलीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्तनागपुरात उद्या होणारा रामनवमीसाठी शहरातील अनेक भागांमध्ये चौक सजले आहेत. ठिकठिकाणी शोभायात्रा निघत असून ज्या भागात हिंसाचार झाला होता त्या चिटणीस पार्क परिसरात वेगवेगळ्या मंदिरात मधून निघणाऱ्या शोभा यात्रेसाठी स्वागताची जय्यत तयारी केलेली आहे. तेच प्रभू रामाच्या अयोध्येतील मूर्तीची प्रतिकृती तसेच मंदिराची प्रतिकृती लावण्यात आली आहे. अनेक ठिकाणी स्वागत गेट उभारण्यात आले आहेत. तर दुसरीकडं दंगलीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Manoj Kumar Funeral Live: मनोज कुमार यांच्यावर आज सकाळी साडेअकरा वाजता जुहू येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणारअभिनेता मनोज कुमार यांना राज्य सन्मान देण्यात आला.
ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचे काल निधन झाले.
मनोज कुमार यांच्यावर आज सकाळी साडेअकरा वाजता जुहू येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत
ठाण्याच्या दिशेने जाणारे लोकल ३० मिनिटांनी उशिरा
तांत्रिक बिघाड झाल्यामुळे चाकरमान्यांचे हाल
मोठ्या प्रमाणात प्रवाशांची रेल्वे स्टेशनवर गर्दी
आरपीएफ रेल्वे पोलीस यांच्याकडून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे
चैत्र पौर्णिमा यात्रेत भाविकांसाठी तुळजाभवानी मंदिर २२ तास खुले ठेवण्यात येणार आहे. ही यात्रा ११ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत साजरी करण्यात येणार आहे.
Chhatrapati Sambhajinagar Live : : छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणावर चाकू हल्लाछत्रपती संभाजीनगरमधील मयूर पार्क परिसरात एका तरुणावर चाकू हल्ला करण्यात आला. हा प्रकार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Shirdi Live : शिर्डीत 3 दिवसीय रामनवमी उत्सवाला सुरुवातउद्या देशभरात उत्साहात रामनवमी साजरी होत आहे. शिर्डीत शुक्रवारपासून तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला सुरुवात झाली आहे.
Latur News : लातूरला अवकळीचा दणका, शेतकऱ्यांचं मोठं नुकसानलातूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने प्रचंड नुकसान झालंय. जिल्ह्यात ३८२ हेक्टरवर बागायती आणि जिरायती पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. नुकसान झालेल्या भागात सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी पाहणी केलीय.
Ahilyanagar News : शिर्डीत रामनवमी उत्सवाला सुरुवातशिर्डीत तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला सुरुवात झालीय. यंदा उत्सवाचे ११४वे वर्ष असून मोठ्या संख्येनं पायी पालख्या शिर्डीत दाखल होत आहेत. साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
Nanded Tractor accident : ट्रॅक्टर दुर्घटना प्रकरणी चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यातनांदेडमध्ये आलेगाव शिवारात ट्रॅक्टर विहिरीत कोसळून सात महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी ट्रॅक्टर चालक नागेश आवटे याला ताब्यात घेण्यात आलंय.
Satara News गुलालात न्हाला श्री नाईकबाचा डोंगर, भाविकांच्या अलोट गर्दीत 'श्रीं'चा पालखी सोहळा उत्साहातढेबेवाडी : श्री क्षेत्र नाईकबाचा डोंगर गुलालात न्हाला. चांगभलंच्या अखंड गजरात श्रींचा पालखी सोहळा उत्साहात झाला. महाराष्ट्र- कर्नाटकातील लाखो भाविकांनी या वेळी हजेरी लावल्याने जणू भक्तीचा सागरच अवतरल्याचा भास झाला.
Pune News : डॉ. घैसास यांचे नर्सिंग होम फोडल्याने भाजप आंदोलक महिलांवर गुन्हा दाखलपुण्यातील दीनानाथ रुगणालयाच्या निषेधार्थ पुण्यातील भाजप महिला आघाडीच्या महिलांनी डॉ. सुश्रुत घैसास यांचे खासगी रुग्णालयाची तोडफोड केली. या प्रकरणी आता आंदोलक महिलांवर खासगी वस्तूची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलंकार पोलीस ठाण्यात या महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Marathwada University LIVE : मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न ४७६ महाविद्यालयांतील पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांना आजपासून सुरुवातछत्रपती संभाजीनगरच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न ४७६ महाविद्यालयांतील पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांना आजपासून सुरुवात होत आहे. या परीक्षेसाठी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या ४७ हजार २३७ विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत परीक्षा अर्ज भरले नाहीत, तरीही परीक्षा विभागाने शेवटच्या दिवसापर्यंत लेट फी भरून परीक्षेसाठी मुभा दिली आहे.
Thane Police LIVE : डोंबिवली किंग, रील स्टार सुरेंद्र पाटीलला अखेर अटक, ठाणे पोलिसांची कारवाईठाणे : डोंबिवलीचा स्वयंघोषित कथित डोंबिवली किंग इंस्टाग्राम रील स्टार सुरेंद्र पाटील याला अखेर ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. सुरेंद्रचे इंस्टाग्राम या समाजमाध्यमावर २७६ के इतके फॉलोवर्स आहेत. सुरेंद्र पाटील यांच्या विरोधात लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. खंडणी विरोधी पथकाने त्याला नाशिक येथून अटक केली.
Mohanrao Kadam Agriculture College : मोहनराव कदम कृषी महाविद्यालयात आज ड्रॅगन फ्रुट पीक राष्ट्रीय परिसंवादकडेगाव : भारती विद्यापीठाचे लोकनेते मोहनराव कदम कृषी व उद्यानविद्या महाविद्यालयात आज (ता. ५) एकदिवसीय ‘ड्रॅगन फ्रुट पीक राष्ट्रीय परिसंवाद-२०२५’ ड्रॅगन फ्रुट उत्पादक शेतकऱ्यांसाठी आयोजित केला आहे. लोकनेते मोहनराव कदम कृषी व उद्यानविद्या महाविद्यालय, महा ड्रॅगन फ्रुट असोसिएशन, महाराष्ट्र राज्य व भारतीय कृषी संशोधन परिषदेचे राष्ट्रीय अजैविक ताण संशोधन संस्था मालेगाव, बारामती यांच्यातर्फे परिसंवाद आहे. माजी आमदार मोहनराव कदम यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
Prashant Koratkar LIVE : प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणीकोल्हापूर : प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीन अर्ज फेटाळल्याने प्रशांत कोरटकरच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायालयात पुन्हा अर्ज दाखल करण्यात आला. सोमवारी (ता. ७) या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. पोलिसांसह सरकारी वकील जामीन नामंजूर होण्यासाठी युक्तिवाद करतील. तसेच बचाव पक्षाकडूनही युक्तिवाद झाल्यानंतर कोरटकरच्या जामिनाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या कोरटकरला कळंबा कारागृहाच्या अंडा बरॅकमध्येच ठेवण्यात आले आहे.
Dr. Vilas Ujawane Passes Away : ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन, आज अंत्यसंस्कारमुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांच्या निधनाने कला विश्वावर शोककळा पसरली आहे. संपूर्ण कलाविश्व ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनाचा शोक व्यक्त करत असताना, मराठी मनोरंजन विश्वावरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 'चार दिवस सासूचे', 'दामिनी', 'वादळवाट' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणाऱ्या डॉ. उजवणे यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. उजवणे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Eknath Shinde LIVE : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज सरवडेत सभासरवडे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज (ता. ५) सायंकाळी येथील खोराटे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मैदानावर सभा होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी येथे दिली. दरम्यान, शिंदे यांचे आज सायंकाळी साडेचारच्या दरम्यान कोल्हापूर विमानतळ येथे आगमन होईल. तेथून ते हेलिकॉप्टरने बिद्री (ता. कागल) कडे जातील. तेथून मोटारीने आदमापूरकडे जातील. तेथे श्री संत बाळूमामा मंदिरात दर्शन घेऊन ते सभास्थळी येतील. त्यानंतर मोटारीने कोल्हापूर विमानतळावर येतील व रात्री नऊला मुंबईकडे प्रयाण करतील.
Actor Manoj Kumar Passes Away : ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार कालवश, विलेपार्लेतील पवनहंस स्मशानभूमीत आज अंत्यसंस्कारLatest Marathi Live Updates 5 April 2025 : देशभक्तिपर चित्रपटांतून अभिनयाचा ठसा उमटवत ‘भारतकुमार’ अशी उपाधी मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक मनोजकुमार (वय ८७) यांचे कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तसेच मराठी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांच्या निधनाने कला विश्वावर शोककळा पसरली आहे. डॉ. उजवणे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर थेट रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळल्याने सात महिला मजुरांचा मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना आलेगाव (ता. नांदेड) शिवारात शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज सायंकाळी येथील खोराटे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मैदानावर सभा होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी येथे दिली. उद्योग व मराठी भाषामंत्री उदय सामंतही आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीन अर्ज फेटाळल्याने प्रशांत कोरटकरच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायालयात पुन्हा अर्ज दाखल करण्यात आला. सोमवारी (ता. ७) या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात बदल पहायला मिळत असून काही भागांत पाऊस पडत असून पिकांचे नुकसान होत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..