Sugar and diabetes :साखर खाल्ल्याने मधुमेह होतो का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
GH News April 05, 2025 10:08 PM

मधुमेह हा आता एक असा आजार बनला आहे ज्याची सर्वांनाच भीती वाटते. हा आजार शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना सर्वाधिक प्रमाणात होताना आपल्याला दिसत आहेव. मधुमेह टाळण्यासाठी लोकं आता साखर खाणेही सोडून देत आहेत. साखर खाल्ल्याने हा आजार होऊ शकतो असा एक सामान्य समज लोकांनमध्ये आहे, पण साखरेमुळे खरोखरच मधुमेह होतो का? त्याचा आजाराशी काय संबंध आहे? साखर न खाणाऱ्या लोकांना कधीच मधुमेह होणार नाही का? याबद्दल आपण तज्ञांकडून जाणून घेऊया.

अपोलो हॉस्पिटल्समधील एंडोक्राइनोलॉजिस्ट आणि मधुमेह तज्ज्ञ डॉ. एस के वांग्नु म्हणतात की शरीरात इन्सुलिन योग्यरित्या तयार होत नाही तेव्हा मधुमेह होतो. इन्सुलिनच्या कार्यात कोणतीही कमतरता असल्यास शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते, ज्यामुळे मधुमेह होतो. या आजाराचे दोन प्रकार आहेत. एक टाईप-1, जो अनुवांशिक आहे. म्हणजे काहींना जन्मापासूनच होऊ शकते. दुसरा प्रकार म्हणजे टाइप-2, जो चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे होतो. गेल्या काही वर्षांपासून टाइप-2 ची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. आता हा आजार अगदी लहान वयातही होऊ लागला आहे.

साखर खाल्ल्याने खरच मधुमेह होतो का?

डॉ. वांग्नु यांच्या नुसार साखरेचा मधुमेहाशी थेट संबंध नाही. साखर खाल्ल्याने मधुमेह होईल असे नाही. मधुमेह होण्याचे प्रमाण व्यक्तीच्या जनुकांवर, त्याच्या शरीरात वाढत्या लठ्ठपणावर आणि त्याच्या जीवनशैलीवर अवलंबून असते. जरी तुम्ही दररोज साखर खात असाल आणि व्यायाम करत असाल तरी टाइप-2 मधुमेहाचा धोका कमी होतो.

साखर सोडली तर कधीच मधुमेह होणार नाही का?

पब्लिक हेल्थ एक्सपर्ट डॉ. जुगल किशोर सांगतात की साखर न खाल्ल्याने मधुमेह हा आजार होत नाही. तुम्ही जर साखरेचे पदार्थ किंवा साखर खाणंच बंद केले तर मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो, परंतु साखर सोडणे आणि मधुमेह न होणे यात वैद्यकीय शास्त्रात कोणताही संबंध नाही. जर एखाद्या व्यक्तीची जीवनशैली योग्या नसेल, तसेच एखादा व्यक्ती खुप मानसिक तणावाखाली असेल. जर एखाद्या व्यक्तीचे वजन जास्त असेल आणि त्याच्या जनुकांमध्ये समस्या असतील तर तो साखर खात नसला तरीही त्याला मधुमेह होऊ शकतो. म्हणून लोक मर्यादित प्रमाणात साखरेचे सेवन करू शकतात.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, एक प्रौढ व्यक्ती दिवसाला २५ ग्रॅम साखर खाऊ शकते. हो, यापेक्षा जास्त साखर खाण्याचे अनेक नुकसान शरीराला होऊ शकतात.

जास्त साखर खाण्याचे नुकसान

साखरेच्या सेवनामुळे वजन वाढू शकते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो. जास्त साखर खाल्ल्याने तुमचे दात देखील खराब होऊ शकतात. पण जर तुम्ही मधुमेहाच्या भीतीने साखर खाणे सोडून देत असाल तर हे योग्य नाही. जर तुमची जीवनशैली चांगली असेल आणि तुम्ही दररोज व्यायाम करत असाल. जर कुटुंबात कोणालाही अनुवांशिक मधुमेह नसेल आणि निरोगी आहार घेत असाल तर साखर मर्यादित प्रमाणात सेवन केली जाऊ शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.