-rat५p२१.jpg-
२५N५५७००
अन्वी मोहिते
------
अन्वी मोहितेचे यश
लांजा ः तालुक्यातील आगवे-मोरेवाडी शाळेने नवोदय परीक्षेत यश मिळवले. या शाळेतील अन्वी मोहिते हिची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली. नियोजनबद्ध व सातत्यपूर्ण अभ्यास हे यशाचे गमक असल्याचे अन्वीने सांगितले. मुख्याध्यापक काशिनाथ घाणेकर, उपशिक्षक नितीन मोहिते यांनी तिला मार्गदर्शन केले.
-------
राजापुरात आज
श्रीरामनवमी उत्सव
राजापूर ः शहरातील विठ्ठल रामपंचायतन मंदिरामध्ये रविवारी (ता. ६) श्रीराम नवमी उत्सव साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने सकाळी ९.३० वा. अभिषेक पूजा, १०.३० वा. निकिता शेलार यांचे रामजन्मोत्सवाचे कीर्तन, त्यानंतर आरती व प्रसाद, सामूहिक प्रार्थना, सायंकाळी ५ वा. रामतांडव स्तोत्र पठण, राम नामस्मरण गजर, सामूहिक रामरक्षा पठण, आरती, रात्री ८ वा. भजन आणि अभंग गायन होणार आहे.