-शिर्डी साईनगरीत रामनवमीच्या निमित्ताने मोठ्या उत्साहात सणाची तयारी चालू आहे.
- पहाटे पासून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
Live: मुंबईचे डबेवाले ९ एप्रिल पासून सहा दिवसांच्या सुटीवर जाणारमुंबईचे डबेवाले ९ एप्रिल पासून सहा दिवसांच्या सुटीवर जाणार
डबेवाले आपल्या गावी ग्रामदैवत- कुलदैवताच्या यात्रेसाठी जाणार आहेत.
Live: शिंदेनी केलेल्या 'युज अँड थ्रो'च्या टीकेला राऊतांच उत्तर- शिंदेनी केलेल्या 'युज अँड थ्रो'च्या टीकेला राऊतांच उत्तर
- युबीटी यामध्ये बी आहे, तो त्यांना काढता येणार नाही असे शिंदेंना राऊतांनी उत्तर दिले आहे.
Live: राष्ट्रपती मुर्मू यांनी राम नवमीच्या शुभेच्छा दिल्याराष्ट्रपती मुर्मू यांनी राम नवमीच्या शुभेच्छा दिल्या
Pandharpur Live : पंढरपुरात विठ्ठलाच्या मंदिरात भाविकांची गर्दीआज रामनवमी निमित्त विठ्ठल मंदिर फुलांनी सजवले आहे. दुपारी १२ वाजता जन्म सोहळा होणार आहे.
१ टन झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आले सभामंडप
Nashik Live: नाशिकच्या काळाराम मंदिरात पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दीनाशिकच्या काळाराम मंदिरात पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी
Nanded : रामनवमीनिमित्त नांदेडमध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनातरामनवमीनिमित्त नांदेडमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. श्रीराम जन्मोत्सव समितीच्यावतीने काढण्यात येणाऱ्या या मिरवणुकीवेळी शहारात मिरवणूक मार्गावर कोणताच अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांनी खबरदारी घेतलीय. शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.
Tuljapur : शुक्रवारी तुळजाभवानी मंदिराचं महाद्वार भाविकांसाठी बंदतुळजाभवानी मातेच्या चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पहाटे तुळजाभवानी मंदिराचं महाद्वार भाविकांसाठी बंद केलं जाणार आहे. यात्रा कालावधीत भाविकांना बिडकर पायऱ्यांवरून मंदिरात सोडलं जाईल. १२ एप्रिलला मंदिरात पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. यात्रा ११ ते १५ एप्रिल या कालावधीत असणार आहे.
वक्फ दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी, विरोधकांची सुप्रीम कोर्टात धाववक्फ दुरुस्ती विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केल्यानंतर कायद्यात रुपांतरीत झालंय. या विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मान्यता दिलीय. लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलं होतं. राष्ट्रपतींना विधेयकावर स्वाक्षरी केली असून हा कायदा आता देशभरात लागू झालाय. दरम्यान या कायद्याला काँग्रेस, एमआयएम आणि आम आदमी पार्टीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय.
Pamban Bridge : पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामेश्वरमध्ये पंबन ब्रीजचं होणार उद्घाटनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज रामेश्वरम इथल्या पंबन व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिजचे उद्घाटन होणार आहे. रामनवमीला पहिल्या व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे सी ब्रिजचं लोकार्पण हा अविस्मरणीय क्षण असल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलंय.