National Crisis : आर्थिक असमानता आणि बेकारी दुर करण्यात यश आल्यास देश महासत्ता बनू शकेल
esakal April 06, 2025 04:45 AM

किल्लेमच्छिंद्रगड : देशाची लोकसंख्या वेगाने वाढत आहे, ज्यामुळे आर्थिक असमानता आणि बेरोजगारी यासारख्या जटिल समस्या न वाढीस लागल्या आहेत. सामान्य माणसाला दोन वेळच्या भाकरीची समस्या गंभीर बनू लागली आहे. ज्यामुळे सामाजिक -आर्थिक पातळी स्पष्टपणे तीव्र फॉर्म घेत आहे. ही समस्या सोडवणे हे सरकार आणि समाजासाठी एक मोठे आव्हान आहे.

आर्थिक असमानतेमुळे देशातील सामाजिक आणि आर्थिक विषमता वाढत आहे. यामुळे, निम्न वर्गातील लोकांना त्यांचे जीवन सुधारण्याची संधी मिळत नाही. आर्थिक असमानतेमुळे लोकांमध्ये असंतोष वाढत आहे, सामाजिक तणाव आणि हिंसाचाराच्या घटना वाढत आहेत.

बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये राग आणि असंतोष वाढत आहे. बेरोजगारीमुळे, लोकांना त्यांचे जीवन सुधारण्याची संधी मिळत नाही, ज्यामुळे ते गुन्हेगारी आणि हिंसाचाराकडे वाटचाल करताना दिसतात. हे सामाजिक स्वास्थाच्या दृष्टीने भुषणावह नाही.

आर्थिक असमानता आणि बेरोजगारीमुळे, देशाची ऐक्य आणि अखंडतेवर नकारात्मक परिणाम करू पाहत आहे. हे देशातील सामाजिक आणि आर्थिक विषमतेचे कुलक्षण मानावे लागेल, ज्यामुळे देशातील ऐक्य आणि अखंडतेस धोका आहे.

आर्थिक असमानता आणि बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी सरकार आणि समाजाला एकत्र काम करावे लागेल. सरकारला आर्थिक विकासासाठी धोरणे आखून ती प्रत्यक्षात कृतीत आणावी लागतील त्याबरोबरच समाजाला सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी काम करावे लागेल.

आर्थिक विकासासाठी धोरणे तयार करणे, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी काम करणे, बेरोजगारीची समस्या सोडवणे, आर्थिक असमानता कमी करणे या मुद्यावर सरकारला तातडीने काम करावे लागेल अन्यथा समाजात वर्ग संपर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

समाजाला स्वतःच्या आर्थिक विकासासाठी काम करावे लागेल जेणेकरून आर्थिक असमानता कमी करण्यात तसेच बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी यश येईल आणि सामाजिक, आर्थिक समता प्रस्थापित करण्यास यश येईल. परिस्थिती कितीही बिकट निर्माण झाली तरी देशाचे ऐक्य आणि अखंडता राखणे हे प्रत्येक नागरीकाचे आद्य कर्तव्य हे समजून घेवून विकासाच्या प्रक्रियेत प्रत्येकाने योगदान दिल्यास देश महासत्ता बनू शकेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.