rat६p१.jpg-
२५N५५८१४
रत्नागिरी : देव, घैसास, कीर महाविद्यालयात आयोजित कार्यशाळेत प्र. प्राचार्य मधुरा पाटील यांचे स्वागत करताना प्रा. वसुंधरा जाधव. सोबत प्रा. वैभव कीर, प्रा. ऋतुजा भोवड, प्रा. वैभव घाणेकर, प्रा. विनय कलमकर.
---
दस्तऐवजीकरण कौशल्यावर कार्यशाळा
‘देव-घैसास’मध्ये कार्यक्रम ; प्रा. साळगांवकर यांचे मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षकांच्या शैक्षणिक कार्यप्रणाली आणि दस्तऐवजीकरण कौशल्ये सुधारण्यासाठी क्षमता निर्माण आणि मार्गदर्शन कार्यशाळेचे यशस्वीपणे आयोजन केले.
कार्यशाळा पाच दिवसांची होती. यामध्ये पहिले सत्र मूल्यांकन पद्धती आणि दस्तऐवजीकरण झाले. यामध्ये शैक्षणिक कार्यप्रदर्शन मूल्यांकनासाठी मूल्यांकन प्रक्रिया आणि पद्धती यांचे वर्णन केले गेले. महाविद्यालययाच्या कला शाखेच्या प्रमुख प्रा. ऋतुजा भोवड यांनी या सत्रामध्ये मार्गदर्शन केले. सत्राचा उद्देश प्रभावी मूल्यांकन तंत्र आणि दस्तऐवजीकरणाचे महत्त्व स्पष्ट करणे असा होता.
नवीन अध्यापन पद्धती आणि दस्तऐवजीकरण या सत्रामध्ये विज्ञान शाखेचे प्रमुख प्रा. वैभव घाणेकर आणि सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. वैभव कीर यांनी मार्गदर्शन केले. यात नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि नॅक मूल्यांकनासाठी दस्तऐवजीकरणाचे महत्त्व समजावून सांगितले.
संशोधन पेपर लेखन आणि दस्तऐवजीकरण या सत्रात वाणिज्य शाखेच्या प्रमुख प्रा. राखी साळगांवकर यांनी सखोल मार्गदर्शन केले. नॅकसाठी कागदी दस्तऐवजीकरण या सत्रात परीक्षा विभाग प्रमुख प्रा. विनय कलमकर यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या वार्षिक अंकासाठी अहवालाबाबतच्या सत्रात महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्ष समन्वयक प्रा. वसुंधरा जाधव यांनी सखोल मार्गदर्शन केले. शिक्षकांना वार्षिकांकासाठी सुसंगत अहवाल तयार करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे नियोजन प्रा. वसुंधरा जाधव यांनी केले. प्रभारी प्राचार्या माधुरा पाटील यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. महाविद्यालयीन शैक्षणिक गुणवत्ता, दस्तऐवजीकरण पद्धती आणि नॅकच्या तयारीत अधिक सुधारणा करण्याच्या उद्देशाने राबवण्यात आले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.