बारामतीतील सोरटेवाडी इथं पैशाच्या देवाण-घेवाणीच्या वादातून एका युवकाचा खून करण्यात आला आह. एका 27 वर्षीय युवकावर धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली आहे.
Nanded Live : नांदेडमध्ये शॉर्ट सर्किटमुळे गोठ्याला आग, दोन बैलांचा मृत्यूनांदेडच्या अर्धापूर तालुक्यात शॉर्ट सर्किटमुळे गोठ्याला आग लागली. या आगीत दोन बैलासह शेतातील अवजारे जळून खाक झाले आहे. यामध्ये शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालय.
राहुल गांधी 7 एप्रिल रोजी बेगुसराय येथे 'स्थलांतर थांबवा, नोकऱ्या द्या' अभियान राबवणारराहुल गांधी 7 एप्रिल रोजी बेगुसराय येथे 'स्थलांतर थांबवा, नोकऱ्या द्या' अभियान राबवणार
Mumbai News: मालवणी श्रीराम नवमी उत्सव मिरवणुकीसाठी मालवणी पोलिसांचा हायटेक बंदोबस्त6 ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने गर्दीतील हालचालींवर ठेवणार लक्ष
मागील वर्षीच्या रामनवमी वेळी झालेल्या दंगलीच्या स्थितीनंतर आता पोलिस बंदोबस्तासोबत गर्दीतील हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन ची मदत
मालवणी सायबर टीम आणि इतर पोलिस अधिकारी आणि खाजगी ड्रोन पथक ठेवणार गर्दीवर बारीक लक्ष
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पोर्तुगाल आणि स्लोवाकियाच्या ४ दिवसांच्या राजकीय दौऱ्यासाठी रवानाराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पोर्तुगाल आणि स्लोवाकियाच्या ४ दिवसांच्या राजकीय दौऱ्यासाठी रवाना
एम.ए. बेबी यांची सीपीआयच्या सरचिटणीसपदी निवडएम.ए. बेबी यांची सीपीआयच्या सरचिटणीसपदी निवड झाली आहे.
Pune Live : ५ मे पर्यंत पुणे शहरात ड्रोन उडवण्यास बंदीपुणे शहर पोलिसांच्या वतीने आदेश जारी
आजपासून ५ मे पर्यंत आदेश राहणार जारी
ड्रोन सह रिमोट कंट्रोल लाईट एअरक्राफ्ट, पॅराग्लिडिंग, हॉट एयर बलून याच्या वापरावर सुद्धा प्रतिबंधात्मक आदेश लागू
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाणार
Live : धुळ्यात तापमानाचा पारा वाढला, 42.5°c इतक्या तापमानाची नोंदधुळ्यात तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून आज धुळ्यात 42.5°c इतक्या उचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे,
यंदाच्या हंगामातील हे सर्वात उच्चांकित तापमान मानलं जात असून, यामुळे अक्षरशः रस्त्यांवर शुकशुकाट बघावयास मिळत आहे,
दोन दिवस अधून मधून पडलेल्या अवकाळी पावसानंतर आता धुळ्याच्या तापमानामध्ये प्रचंड वाढ झाली आहे, धुळेकरांना प्रचंड वाढलेल्या उन्हाच्या झळा आता सोसावा लागत आहेत,
तापमानाचा पारा प्रचंड वाढल्यामुळे धुळेकर नागरिक घराबाहेर नपडनच पसंत करत आहेत, त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट बघायला मिळत आहे,
यापुढे देखील तापमानात आणखीन वाढ होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.
Live : डोंबिवलीत शेयर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या नावाखाली कोट्यवधीचा गंडादुप्पट तिप्पट दहापट परताव्याचे आम्हीच दाखवून गुंतवणूकदारांची कोठे व त्यांचे फसवणूक झाल्याच्या घटना या आधी देखील उजेडात आल्यात .टोरेस घोटाळा ताजा असतानाच डोंबिवलीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधीची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 'शेअर मार्केट'मध्ये मोठा परतावा देतो म्हणत 'ग्रोथअप इंडिया' आणि 'अर्थयुक्ती कन्सल्टिंग'च्या नावाखाली तब्बल 1 कोटी 23 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक केली आहे .अनिकेत मुजुमदार, संदेश जोशी आणि संकेत जोशी अशी तिघांची नावे आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन पांबन रेल्वे पुलाचे उद्घाटन आणि अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन पांबन रेल्वे पुलाचे उद्घाटन आणि अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी
हरवलेली मुलगी अवघ्या २ तासांत मिळाली! पुणे पोलिसांची कार्यतत्परतापुण्यातील शेळके वस्तीतून हरवलेली ८ वर्षांची चिमुरडी पुणे पोलिसांनी शोधली अवघ्या २ तासात
पुण्यातील शेळके वस्तीतून नातेवाईकांच्या घरून ८ वर्षांची मुलगी झाली होती बेपत्ता
मुलगी हरवलेल्या परिसरातील सर्व CCTV तपासात बिबवेवाडी पोलिसांनी घेतला मुलीचा शोध
अवघ्या दोन तासात चिमुकली केली तिच्या पालकांना स्वाधीन
दिव्या कमलाकर मासाळे असं बेपत्ता झालेल्या मुलीचे नाव
मुलीच्या वडिलांनी दिली होती मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद
पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे बेपत्ता झालेली मुलगी वेळेत सापडली
Solapur Live : सोलापुरात मराठीचा मुद्दा पेटला; मनसेने बँकेला पाठवलं निवेदनसोलापुरात मराठीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झालीये. माढा तालुक्यातील मोडनिंब येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या अधिकाऱ्यांना मनसेने निवेदन पाठवले आहे. बँकेच्या कामकाजाची नियमावली, फलक मराठी भाषेत व्हावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. जर आठ दिवसात अंमलबजावणी झाली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
Live : बारामतीत गुंडगिरी खपवून घेणार नाही, प्रसंगी मकोका लावू : उपमुख्यमंत्री अजित पवार; युवकाला चार जणांकडून मारहाण प्रकरणकसलीही दादागिरी, गुंडगिरी बारामती खपवून घेणार नाही, शहरात गुंडगिरी करणा-यांवर प्रसंगी माेकाची कारवाई करु, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. बारामती पंचायत समितीत रविवारी झालेल्या कार्यक्रमात बोलताना पवार यांनी हा इशारा दिला.
Pune Live : तनिषा भिसे प्रकरणात कुटूंबियांचे रुग्णालयावर गंभीर आरोपतनिषा भिसे प्रकरणावर कुटूंबियांनी प्रतिक्रिया देताना रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, "डॉक्टर धनंजय केळकर यांनी पत्राच्या माध्यमातून मांडलेले मुद्दे संपूर्णपणे खोटे आहेत. आम्ही डॉक्टरांना सांगूनच हॉस्पिटलच्याबाहेर पडलो होतो. यासाठी हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज खुले करा सीसीटीव्ही फुटेज माध्यमांना द्या, म्हणजे सत्य समोर येईल. तनिषा भिसे यांच्या आजाराबाबत खाजगी बाबी हॉस्पिटलने सार्वजनिक करायला नको होत्या. तो कायद्याने गुन्हा आहे याबाबत आम्ही कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करणार."
Pune Live : खराडी बायपास रस्त्याजवळील एका हॉटेलला लागली आग ; आग विझवण्याचे प्रयत्न सुरुखराडी बायपास रस्त्यावर प्राईड आयकॉन या इमारतीत एका हॉटेलमध्ये आग लागली आहे. अग्निशमन दलाची चार वाहने दाखल होत आग विझवण्याचे काम सुरु आहे.
Pune Live : भारती विद्यापीठ रुग्णालयात लॅबमध्ये आगकाञज, भारती विद्यापीठ रुग्णालयात एका लॅबमध्ये आग लागल्याची घटना; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण
Pune Live : दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलबाहेर सलग तिसऱ्या दिवशी पोलीस बंदोबस्त तैनातदिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल विरोधात गेल्या दोन दिवसांपासून विविध पक्ष, संघटना आंदोलन करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे. हॉस्पिटलबाहेर सलग तिसऱ्या दिवशी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Devendra fadnavis Live : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाशिम दौरा रद्दहेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांचा पोहरादेवी वाशीमचा दौरा रद्द करण्यात आला आहे.
Amit Shaha Live : कमळ हे विश्वासाचे, आशेचे नवीन प्रतीक बनले आहे :अमित शहाअमित शहा यांनी भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त पक्ष कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी म्हटले की, कमळ हे विश्वासाचे, आशेचे नवीन प्रतीक बनले आहे.
-शिर्डी साईनगरीत रामनवमीच्या निमित्ताने मोठ्या उत्साहात सणाची तयारी चालू आहे.
- पहाटे पासून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
Live: मुंबईचे डबेवाले ९ एप्रिल पासून सहा दिवसांच्या सुटीवर जाणारमुंबईचे डबेवाले ९ एप्रिल पासून सहा दिवसांच्या सुटीवर जाणार
डबेवाले आपल्या गावी ग्रामदैवत- कुलदैवताच्या यात्रेसाठी जाणार आहेत.
Live: शिंदेनी केलेल्या 'युज अँड थ्रो'च्या टीकेला राऊतांच उत्तर- शिंदेनी केलेल्या 'युज अँड थ्रो'च्या टीकेला राऊतांच उत्तर
- युबीटी यामध्ये बी आहे, तो त्यांना काढता येणार नाही असे शिंदेंना राऊतांनी उत्तर दिले आहे.
Live: राष्ट्रपती मुर्मू यांनी राम नवमीच्या शुभेच्छा दिल्याराष्ट्रपती मुर्मू यांनी राम नवमीच्या शुभेच्छा दिल्या
Pandharpur Live : पंढरपुरात विठ्ठलाच्या मंदिरात भाविकांची गर्दीआज रामनवमी निमित्त विठ्ठल मंदिर फुलांनी सजवले आहे. दुपारी १२ वाजता जन्म सोहळा होणार आहे.
१ टन झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आले सभामंडप
Nashik Live: नाशिकच्या काळाराम मंदिरात पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दीनाशिकच्या काळाराम मंदिरात पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी
Nanded : रामनवमीनिमित्त नांदेडमध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनातरामनवमीनिमित्त नांदेडमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. श्रीराम जन्मोत्सव समितीच्यावतीने काढण्यात येणाऱ्या या मिरवणुकीवेळी शहारात मिरवणूक मार्गावर कोणताच अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांनी खबरदारी घेतलीय. शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.
Tuljapur : शुक्रवारी तुळजाभवानी मंदिराचं महाद्वार भाविकांसाठी बंदतुळजाभवानी मातेच्या चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पहाटे तुळजाभवानी मंदिराचं महाद्वार भाविकांसाठी बंद केलं जाणार आहे. यात्रा कालावधीत भाविकांना बिडकर पायऱ्यांवरून मंदिरात सोडलं जाईल. १२ एप्रिलला मंदिरात पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. यात्रा ११ ते १५ एप्रिल या कालावधीत असणार आहे.
वक्फ दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी, विरोधकांची सुप्रीम कोर्टात धाववक्फ दुरुस्ती विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केल्यानंतर कायद्यात रुपांतरीत झालंय. या विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मान्यता दिलीय. लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलं होतं. राष्ट्रपतींना विधेयकावर स्वाक्षरी केली असून हा कायदा आता देशभरात लागू झालाय. दरम्यान या कायद्याला काँग्रेस, एमआयएम आणि आम आदमी पार्टीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय.
Pamban Bridge : पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामेश्वरमध्ये पंबन ब्रीजचं होणार उद्घाटनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज रामेश्वरम इथल्या पंबन व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिजचे उद्घाटन होणार आहे. रामनवमीला पहिल्या व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे सी ब्रिजचं लोकार्पण हा अविस्मरणीय क्षण असल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलंय.