इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रविवारी (६ एप्रिल) गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादला ७ विकेट्सने पराभूत केले. हा सामना हैदराबादच्या घरच्या मैदानात झाला होता. या हा गुजरातचा शुभमन गिलच्या नेतृत्वातील चार सामन्यांतील सलग तिसरा विजय ठरला, तर सनरायझर्स हैदराबादला मात्र ५ सामन्यांतील सलग चौथा पराभव आहे. त्यांना फक्त आद्याप एकच विजय मिळवता आला आहे.
या सामन्यात हैदराबादने १५३ धावांचे लक्ष्य गुजरातसमोर ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग गुजरातने १६.४ षटकात ३ विकेट्स गमावत सहज पूर्ण केला. गुजरातच्या विजयात वॉशिंग्टन सुंदर, शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांनी मोलाचा वाटा उचलला.
(बातमी अपडेट होत आहे)