Ncp sp leader jitendra awhad says we can not erase history, we only can learn from it in marathi
Marathi April 09, 2025 10:24 AM


Jitendra Awhad On Mahatma Phule Film : मुंबई : छावा चित्रपटानंतर आता अनंत महादेवन दिग्दर्शित फुले चित्रपटावरून सध्या चांगलाच वाद पेटण्याची चिन्हे आहेत. या सिनेमाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला. या टिझरवर ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी आक्षेप घेत हा चित्रपट जातीय वाद वाढवणारा असल्याचे वक्तव्य केले आहे. या चित्रपटातील काही दृश्यांवर दवे यांनी आक्षेप घेतला आहे. त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिले आहे. या संदर्भातील पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केली आहे. (ncp sp leader jitendra awhad says we can not erase history, we only can learn from it)

जितेंद्र आव्हाडांची पोस्ट काय ?

महात्मा जोतिराव फुले या सिनेमात जे काही दाखविले जात आहे; ते ऐतिहासिक सत्य आहे, ते नाकारून सत्य बदलता येणार नाही. या देशात जे समाजसुधारक झाले, त्यामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले या दाम्पत्याचे नाव अग्रस्थानी आहे. जे सत्य आहे ते दाखवावेच लागेल, असे आव्हाड म्हणतात. चित्रपटातून सत्य वगळण्यात यावे, यासाठी सिनेमा निर्मात्यावर दबाव आणला जात आहे, हे योग्य नसल्याचे आव्हाडांचे म्हणणे आहे. चित्रपट निर्मात्यांनी या दबावाला बळी पडू नये. जे सत्य आहे ते जगासमोर आलेच पाहिजे. ज्यांनी फुले दाम्पत्याला मदत केली असेल तर त्याचाही उल्लेख असायला हवा. मग, तो कोणत्याही जाती-धर्माचा असो; त्यालाही विरोध होता कामा नये. इतिहास बदलता येत नाही. मात्र, इतिहासातील चुका सुधारतच समाज पुढे जात असतो, असे आव्हाड शेवटी म्हणतात.

हेही वाचा – Kedar Jadhav : केदार जाधव राजकारणाच्या मैदानात, भाजपाकडून करणार बॅटिंग

सिनेमावर नेमका आक्षेप काय?

फुले चित्रपट जातीय वाद वाढवणार असल्याचं सांगत ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांचा फुले चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतला. चित्रपट एकतर्फी नको तर तो सर्वसमावेशक असावा असं मतही आनंद दवे यांनी व्यक्त केलं. त्या काळी ब्राह्मण समाजाने केलेली मदत चित्रपटात दाखवा अशी मागणी दवेंनी केली आहे. याच मुद्द्यावरून आव्हाड यांनी सुनावले आहे.

दरम्यान या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी फुले चित्रपटासाठी राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे. दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी प्रत्येक सिनेमा तयार होताना त्याची सिनेमॅटिक लिबर्टी प्रत्येक दिग्दर्शक घेत असतो. अनेक पुस्तके आणि उपलब्ध साधनांचा अभ्यास करून हा चित्रपट बनवला असल्याचं ते म्हणालेत. या चित्रपटावरून सध्या राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रीया येत आहेत.

झी स्टुडिओज् प्रस्तुत, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रोडक्शन्स निर्मित ‘फुले’ या हिंदी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. 11एप्रिल 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला हा चित्रपट येणार आहे. दरम्यान अनंत दवेंच्या वक्तव्यावरून अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा – Dombivli News : इंग्रजीवरून डोंबिवलीत वादाच्या ठिगण्या, ‘Excuse Me’ म्हटल्याने एका पुरूषासह तीन महिलांना बेदम मारहाण

सिनेमाच्या निर्माते, दिग्दर्शकांनी घेतली छगन भुजबळांची भेट

मुंबई येथे महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित फुले या चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. प्रत्येक चित्रपट तयार होताना सिनेमॅटिक लिबर्टी प्रत्येक दिग्दर्शक घेत असतो मात्र या चित्रपटात वस्तुस्थिती दाखवण्यात आली आहे. अनेक पुस्तकांचा आणि विविध उपलब्ध साधनांचा अभ्यास करूनच हा चित्रपट बनवण्यात आल्याचे मत चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी व्यक्त केले.





Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.