चंद्रपुरात रुग्णवाहिका, शववाहिका व पाणी टँकर यांच्या दरात वाढ; नोटा उधळत पालिकेसमोर आंदोलन
Marathi April 17, 2025 11:25 PM

चंद्रपूर महानगरपालिकेने रुग्णवाहिका, शववाहिका व पाणी टँकर यांच्या दरात वाढ केली, असा आरोप करत जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी उपायुक्त यांच्या वाहनांवर नकली नोटा उधळत महानगर पालिकेसमोर आंदोलन केलं. यापूर्वी आयुक्तांच्या वाहनावर अशा नोटा उधळल्या होत्या.

याप्रकरणी आयुक्तांनी पोलिसात तक्रार दिली होती. शहराच्या हद्दीत यापूर्वी मनपाच्या रुग्णवाहिकेची सेवा निशुल्क होती. आता यासाठी 500 रुपये भाडे आकारण्यात आले. मनपा हद्दीच्या बाहेर रुग्णवाहिका व शववाहिकेसाठी 200 रुपये भाडे आकारण्यात येत होते. 1 एप्रिलपासून मनपा 200 ऐवजी 1000 रुपये म्हणजे पाचपट भाडे आकारण्यात येणार आहे. खासगी रुग्णवाहिका व शववाहिका चालक 15 किलोमीटर मागे एक लिटर पेट्रोल-डिझेलचा खर्च घेतात. मनपा रुग्णवाहिकेसाठी 10 किलोमीटर मागे एक लिटर पेट्रोल व शववाहिकेसाठी 8 किलोमीटर मागे एक लिटर डिझेल घेत असल्याने इंधनाचा खर्चही जास्त लागणार, असा आरोप करत दरवाढ रद्द करण्याची मागणी देशमुख यांनी केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.