सनरायजर्स हैदराबाद टीम आणि त्यांचे फलंदाज आणि मोठी धावसंख्या आणि स्फोटक बॅटिंगसाठी ओळखले जातात. हैदराबादने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील काही सामन्यात धमाकेदार खेळी करत प्रतिस्पर्धी संघात दहशत तयार केली. हैदराबादने पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात विक्रमी धावांचा यशस्वी पाठलाग करत दुसरा विजय मिळवला. मात्र हैदराबाद पुन्हा एकदा आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरली आहे. हैदराबादला मुंबई इंडियन्सविरुद्ध 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 162 धावाच करता आल्या आहेत. मुंबईच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांना बांधून ठेवलं आणि मोठी धावसंख्या करण्यापासून पद्धतशीर रोखलं.