आयपीएल स्पर्धा दिवसागणित रोमांचक मोडवर येताना दिसत आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. प्रत्येक जय परायजानंतर गुणतालिकेचं गणित वरखाली होताना दिसत आहे. असं असताना बीसीसीआयने दक्षिण अफ्रिका आणि श्रीलंकेसोबत होणाऱ्या तिरंगी वनडे मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात 15 खेळाडूंची निवड केली आहे. या संघाच्या उपकर्णधारपदाची धुरा स्मृती मंधानाच्या खांद्यावर आहे. भारत, दक्षिण अफ्रिका आणि श्रीलंक यांच्यात 27 एप्रिलपासून तिरंगी मालिका सुरु होणार आहे. ही मालिका श्रीलंकेत होणार आहे. प्रत्येक संघ प्रत्येकी 4 सामने खेळेल. म्हणजेच प्रत्येक संघासोबत 2-2 सामने होतील. बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा करताना सांगितलं की, रेणुका सिंग आणि तितस साधू जखमी असल्याने ते संघात निवडीसाठी उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्यांची संघात निवड झाली नाही.
भारताचा या मालिकेतील पहिला सामना श्रीलंकेविरुद्ध 27 एप्रिलला होणार आहे. त्यानंतर 29 एप्रिलला दुसरा सामना दक्षिण अफ्रिकेविरुद्ध, 4 मे रोजी तिसरा सामना श्रीलंकेविरुद्ध आणि 7 मे रोजी दक्षिण अफ्रिकेविरुद्ध शेवटचा सामना होणार आहे. हे सर्व सामने कोलंबोत होणार आहेत. 11 मे रोजी अव्व असलेल्या दोन संघात अंतिम फेरीचा सामना खेळवला जाणार आहे. आयसीसी वनडे क्रमवारीत भारतीय महिला संघ तिसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण अफ्रिका संघ चौथ्या तर श्रीलंका आठव्या स्थानावर आहे.
तिरंगी मालिकेसाठी निवडलेला भारतीय महिला संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, काशवी गौतम, स्नेह राणा, अरविंद, अरविंद, अरविंद, शुक्ल राऊत. उपाध्याय.