Punjab Kings vs Chennai Super Kings Marathi Update : २४ वर्षीय प्रियांश आर्याने ( Priyansh Arya) ने चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांना चांगला चोप दिला. श्रेयस अय्यर, ग्लेन मॅक्सवेल व मार्कस स्टॉयनिस सारख्या आक्रमक फलंदाजांना शांत ठेवण्यात चेन्नईला यश मिळाले. पण, प्रियांशला रोखताना त्यांच्या नाकी नऊ आले. त्याने षटकारानेच डावाची सुरुवात केली होती. त्याला दोन जीवदानही मिळाले आणि त्याचा पुरेपूर फायदा त्याने उचलला. त्याने ३९ चेंडूंत शतक पूर्ण केले. पंजाब किंग्सकडून हे सर्वात वेगवान शतक ठरले. त्याच्या शतकात ७ चौकार व ९ षटकारांचा समावेश आहे.
IPL मध्ये सर्वात जलद शतक (चेंडू):30 चेंडू – ख्रिस गेल वि. पुणे वॉरियर्स इंडिया
37 चेंडू – युसूफ पठाण वि. मुंबई इंडियन्स
38 चेंडू – डेव्हिड मिलर वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
39 चेंडू – ट्रॅव्हिस हेड वि.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
39 चेंडू – प्रियांश आर्या वि. चेन्नई सुपर किंग्स*
41 चेंडू – विल जॅक्स वि. गुजरात टायटन्स
42 चेंडू – अॅडम गिलख्रिस्ट वि. मुंबई इंडियन्स
43 चेंडू – ए.बी. डिविलियर्स वि. गुजरात लायन्स
43 चेंडू – डेव्हिड वॉर्नर वि. कोलकाता नाईट रायडर्स
45 चेंडू – सनथ जयसूर्या वि. चेन्नई सुपर किंग्स
37 चेंडू – युसूफ पठाण वि. मुंबई इंडियन्स
39 चेंडू – प्रियांश आर्या वि. चेन्नई सुपर किंग्स
45 चेंडू – मयांक अग्रवाल वि. राजस्थान रॉयल्स
45 चेंडू – इशान किशन वि. राजस्थान रॉयल्स
46 चेंडू – मुरली विजय वि. राजस्थान रॉयल्स
47 चेंडू – विराट कोहली वि. पंजाब किंग्ज
48 चेंडू – वीरेंद्र सेहवाग वि. डेक्कन चार्जर्स
49 चेंडू – रिद्धिमान साहा वि. कोलकाता नाईट रायडर्स
मुकेश चौधरीने त्याच्या पहिल्या षटकात प्रभसिमरन सिंगला ( ०) त्रिफळाचीत केले. कर्णधार श्रेयसने षटकाराने आशा पल्लवीत केल्या, परंतु खलीलने त्याचाही त्रिफळा उडवला. अय्यर ९ धावांवर बाद झाला. खलीलने भरपूर धावा दिल्या खऱ्या, परंतु त्याचे विकेट घेण्याचे सत्र सुरू राहिले. पुढील षटकात त्याने मार्कस स्टॉयनिसला ( ४) माघारी पाठवून पंजाबची अवस्था ३ बाद ५४ अशी केली. आर अश्विनने दोन धक्के देताना निम्मा संघ ८५ धावांत तंबूत पाठवला. पण, प्रियांश मैदानावर उभा राहिला आणि त्याने ४२ चेंडूंत ७ चौकार व ९ षटकारांसह १०३ धावांची खेळी केली.
प्रियांशने दिल्लीच्या स्थानिक ट्वेंटी-२० लीगमध्ये सहा चेंडूत सहा षटाकर खेचले होते. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत त्याने दिल्लीकडून ९ सामन्यांत सर्वाधिक ३२५ धावा केल्या होत्या.