Shiv Sena UBT : ठाकरे गटाने जाहीर केली प्रवक्त्यांची यादी, जाणून घ्या, कुणाला मिळाले आहे स्थान?
Sarkarnama April 10, 2025 07:45 AM
संजय राऊत - ठाकरे गटाचे खासदार अन् फायरब्रॅण्ड नेते संजय राऊत यांना मुख्य प्रवक्ते पदावर कायम ठेवले आहे. अरविंद सावंत -

ठाकरे गटाने खासदार अरविंद सावंत यांनाही मुख्य प्रवक्ते पदाची जबाबदारी दिलेली आहे.

अनिल परब -

ठाकरे गटाचे आक्रमक नेते, आमदार अनिल परब यांना प्रवक्ते करण्यात आलेलं आहे.

प्रियंका चतुर्वेदी -

राज्यसभा खासदार अन् उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही प्रवक्त्या करण्यात आलं आहे.

किशोरी पेडणेकर -

ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या देखील प्रवक्त्या असणार आहेत.

सुषमा अंधारे -

ठाकरे गटाच्या आक्रमक उपनेत्या सुषमा अंधारे या देखील प्रवक्त्या असणार आहेत.

संजना घाडी -

ठाकरे गटाने उपनेत्या संजना घाडी यांचाही प्रवक्त्यांच्या यादीत समावेश केला आहे.

आनंद दुबे -

ठाकरे गटाने आनंद दुबे यांनाही आपल्या प्रवक्त्यांच्या यादीत स्थान दिलं आहे.

अॅड.हर्षल प्रधान -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जनसंपर्क प्रमुख अॅड.हर्षल प्रधान यांनाही प्रवक्ता पदाची जबाबदारी मिळाली आहे.

Amruta Fadnavis Next : अमृता फडणवीस यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी कशी झाली भेट?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.