संसदेत मंजुर करण्यात आलेल्या वक्फ सुधारणा विधेयकाला मुस्लिम बांधवांकडुन कडाडून विरोध केला जात असुन धाराशिव मध्ये बुधवारी मुस्लिम बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
दोन तास केलेल्या या आंदोलनात समाज बांधवांनी वक्फ सुधारणा विधेयक समाजावर अन्याय करणारे असल्याचा भावना व्यक्त केल्या
यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत वक्फ विधेयक मागे घेण्याची मागणीही आंदोलकांनी केली आहे.
या आंदोलनात हजारो मुस्लिम समाज बांधव सहभागी झाले होते.