उन्हाळ्यात त्वचेची अतिरिक्त काळजी घेणे खूप महत्वाचे असते. तीव्र सूर्यप्रकाश, धूळ आणि घामामुळे त्वचेला गंभीर नुकसान होऊ शकते. यामुळे त्वचेशी निगडीत अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात. तसेच, त्वचेची चमकही नाहीशी होते. उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक लोक विविध सौंदर्यप्रसाधने वापरतात. पण त्यामध्ये हानिकारक रसायने असतात, जी त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात. अशा परिस्थितीत रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर काही नैसर्गिक गोष्टी लावू शकता.ज्या लावल्यास त्वचेला पोषण आणि ओलावा मिळतो. यामुळे तुमची त्वचा ताजी, मऊ आणि चमकदार दिसेल. चला तर जाणून घेऊयात उन्हाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर काय लावावे?
उन्हाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर कोरफडीचा रस लावू शकता. त्वचेला थंडावा देण्यासोबतच यामुळे त्वचेला ओलावा देखील मिळतो. याशिवाय, कोरफडीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे मुरुम, डाग आणि टॅनिंगच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करतात. शिवाय, उन्हाच्या जळजळीपासून देखील आराम मिळतो. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर कोरफडीच्या जेलचा पातळ थर लावा. रात्रभर चेहऱ्यावर तसेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाण्याने चेहरा धुवा. याचा नियमित वापर केल्याने तुम्हाला नैसर्गिकरित्या चमकणारी त्वचा मिळेल.
उन्हाळ्यात चेहऱ्यावर गुलाबपाणी लावणे देखील खूप फायदेशीर आहे. ते त्वचेला हायड्रेट ठेवते आणि थंड ठेवते. तसेच, यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जाते आणि त्वचेवरील छिद्रे देखील साफ होतात. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कापसाच्या बॉलच्या मदतीने चेहऱ्यावर गुलाबजल लावा. तुम्ही त्यात थोडासा लिंबाचा रस देखील घालू शकता. यामुळे चेहऱ्यावरील डाग दूर होतील. तसेच, त्वचेचा रंग सुधारण्यास देखील मदत होऊ शकते.
उन्हाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही काकडीचा रस चेहऱ्यावर लावू शकता. हा त्वचेला थंडावा देतो आणि उन्हाळ्यात होणाऱ्या त्वचेच्या जळजळीलाही शांत करतो. यासाठी काकडी किसून त्याचा रस काढा. आता कापसाच्या बोळ्याच्या मदतीने तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाण्याने चेहरा धुवा. यामुळे तुमची त्वचा ताजी आणि चमकदार दिसेल.
रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही चेहऱ्यावर दहीदेखील लावू शकता. खरं तर, त्यात लॅक्टिक अॅसिड असते, जे त्वचेवरील डाग दूर करू शकते. याव्यतिरिक्त, ते चेहऱ्यावरील टॅनिंग काढून टाकण्यास आणि त्वचेचा रंग सुधारण्यास देखील मदत करू शकते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर थेट दही लावा आणि 2-4 मिनिटे हलक्या हातांनी मसाज करा. साधारण 20 मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा.
जर तुम्हाला उन्हाळ्यात चमकदार त्वचा मिळवायची असेल तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर कच्चे दूध लावू शकता. खरं तर, ते त्वचेवर साचलेली घाण आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करते. तसेच, यामुळे त्वचेला पोषण मिळते आणि त्वचा मुलायमही होते.यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कापसाच्या मदतीने कच्चे दूध चेहऱ्यावर लावा आणि 35मिनिटे हलक्या हातांनी मसाज करा. रात्रभर तसेच राहू द्या आणि सकाळी पाण्याने चेहरा धुवा. यामुळे तुमची त्वचा मऊ आणि चमकदार दिसेल.
हेही वाचा : Bra Washing Hacks: ब्रा वॉशिंग मशीनमध्ये का धुवू नये?
संपादित – तनवी गुडे