Stock Market Holiday: शेअर बाजार सलग तीन दिवस बंद राहणार; काय आहे कारण?
esakal April 18, 2025 04:45 PM

Stock Market Holiday Good Friday 18 April 2025: आजपासून सलग तीन दिवस भारतीय शेअर बाजार बंद राहणार आहेत. आज शुक्रवार 18 एप्रिल 2025 रोजी, गुड फ्रायडेनिमित्त शेअर बाजार बंद राहील. यानंतर शनिवार आणि रविवार असल्यामुळे शेअर बाजार सलग 3 दिवस बंद राहणार आहे.

आता सोमवार 21 एप्रिल 2025 पासून नियमित व्यवसाय होतील म्हणजेच शेअर बाजारात व्यवहार पुन्हा सुरू होतील. या कालावधीत, एनएसई आणि बीएसईमध्ये इक्विटी, डेरिव्हेटिव्ह्ज आणि सिक्युरिटीज लेंडिंग आणि बोरोइंग (एसएलबी) सेगमेंटमध्ये कोणतेही किंवा सेटलमेंट होणार नाही.

कमोडिटी मार्केटही बंद राहणार

गुड फ्रायडे निमित्त मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) चे दोन्ही सत्रे - सकाळ आणि संध्याकाळचे ट्रेडिंग - पूर्णपणे बंद राहतील. याशिवाय, देशातील सर्वात मोठ्या कृषी कमोडिटी एक्सचेंज, नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज (NCDEX) वर कोणतेही व्यवहार होणार नाहीत.

शेअर बाजार कधी बंद राहील?

गुड फ्रायडे नंतरची पुढील सुट्टी 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिनी असेल. याशिवाय 2025 मध्ये कधी बंद राहील याची संपूर्ण यादी खाली देण्यात आली आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंग आयोजित केला जाऊ शकतो, जो नंतर जाहीर केला जाईल. गुंतवणूकदारांना या सुट्ट्या लक्षात घेऊन त्यांनी ट्रेडिंगचे नियोजन करावे.

  • स्वातंत्र्य दिन - 15 ऑगस्ट (शुक्रवार)

  • गणेश चतुर्थी - 27 ऑगस्ट (बुधवार)

  • गांधी जयंती/दसरा – 2 ऑक्टोबर (गुरुवार)

  • दिवाळी लक्ष्मीपूजन - 21 ऑक्टोबर (मंगळवार)

  • दिवाळी बलिप्रतिपदा - 22 ऑक्टोबर (बुधवार)

  • गुरु नानक देव प्रकाश पर्व – 5 नोव्हेंबर (बुधवार)

  • नाताळ - 25 डिसेंबर (गुरुवार)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.