रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 24 व्या सामन्यात घरच्या मैदानात खेळताना दिल्ली कॅपिटल्ससमोर 164 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 163 धावा केल्या. आरसीबीसाठी फिलिप सॉल्ट आणि टीम डेव्हिड या दोघांनी सर्वाधिक 37 धावांची खेळी केली. टीम डेव्हिड याने फिनीशिंग टच दिला, ज्यामुळे आरसीबी दिल्लीसमोर सन्मानजनक आव्हान ठेवण्यात यशस्वी ठरली. तर त्या दरम्यान विराट कोहली कर्णधार रजत पाटीदार या दोघांनी छोटेखानी मात्र महत्त्वाची खेळी केली.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड आणि यश दयाल.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन: फाफ डू प्लेसिस, जेक फ्रेझर-मॅकगुर्क, केएल राहुल (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, कुलदीप यादव आणि मुकेश कुमार.