Sanjay Raut : घर में घुसके मारेंगे, मग कुलभूषण जाधव यांना का नाही आणलं? संजय राऊत यांचा परखड सवाल
GH News April 11, 2025 04:11 PM

“राणाला अमेरिकेतून आणलं याचं कौतुक आहे पण भाजपने हे ठरवलं पाहिजे की, या राणाला खटला चालवून फासावर लटकवायला आणलेलं आहे की, क्रेडिट घ्यायला आणलं आहे. राणा फेस्टिव्हल करायचा आहे का?” असा परखड सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. “2009 पासून सातत्याने या राणाल आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत होतं. ते मोदीचं सरकार, यूपीए सरकार असं म्हणणं अयोग्य आहे. 2009 साली एनआयएने या राणा आणि हेडली विरुद्ध पहिली एफआयआर लॉज केली. त्यावेळी एनआयएच पथक शिकागो येथे जाऊन राणा आणि हेडलीची चौकशी करुन आले” असं संजय राऊत म्हणाले.

“2012 साली तत्कालीन विदेश मंत्री सलमान खुर्शीद, तेव्हाचे विदेश सचिव अमेरिकेत गेले. त्यांनी राणाला भारतात पाठवण्यासाठी अमेरिकन सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री असलेल्या हिलरी क्लिंटन यांच्यासोबत चर्चा केली. ही एक प्रक्रिया आहे. मी भारत सरकार म्हणेन, कोणताही पक्ष नाही. क्रेडिट घ्यायचं असेल, तर पुतळे उभारा, भाजपवाल्यानी त्याखाली फोटो काढावा” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

कुलभूषण जाधव यांना का नाही आणलं?

“देशाच्या सुरक्षेचा विषय आहे, मग पुलवामाचा क्रेडिट घ्या पाकिस्तानी तुरुंगात असलेल्या कुलभूषण जाधव यांना सोडवू शकलेला नाहीत. भाजपवाले म्हणतात घर में घुसके मारेंगे पण कुलभूषण जाधव, नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांना घेऊन या” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.