Maharashtra Politics Live : शिवाजी महाराजांचे स्माकर राज्यपाल भवनात करा - उदयनराजे भोसले
Sarkarnama April 11, 2025 05:45 PM
फुले चित्रपटाची तारीख पुढे ढकलली, वंचितचे पुण्यात आंदोलन करणार

महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची तारीख पुढे ढकलल्यानंतर पुण्यात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. काही लोकांच्या म्हणण्यामुळे चित्रपटाची तारीख पुढे ढकलल्याचा आरोप वंचितने केला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रकाश आंबेडकर फुलेवाड्या बाहेर करणार आंदोलन करणार आहे. प्रकाश आंबेडकर या आंदोलनाला उपस्थित राहणार आहे.

शिवाजी महाराजांचे स्माकर राज्यपाल भवनात करा - उदयनराजे भोसले

राज्यपाल भवनात राज्यपालांना जागा लागतेच किती? राज्यपाल भवनातछत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

Pratap sarnaik On Ajit Pawar आम्ही अर्थखात्याकडे भीक मागत नाही अधिकार मागतोय - प्रताप सरनाईक

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आली आहे. यावरून एसटी महामंडळावर टीका करण्यात येत आहे. मात्र, अर्थखात्याने निधी दिला नसल्याचे एसटी महामंडळ आर्थिक संकटात आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. आमच्या खात्याकडे पाठवलेली फाईल अर्थखात्याने परत पाठवली. आम्ही अर्थखात्याकडे भीक मागत नाही अधिकार मागतोय, असे देखील सरनाईक म्हणाले.

शहाजीबापू पाटलांना वाऱ्यावर सोडणार नाही - एकनाथ शिंदे

विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांनी सांगितले की, शहाजीबापूसाठी मी एक शब्द बोलेत तो म्हणजे टायगर अभी जिंदा है.

शेजर बाजारात तेजी

मागील काही दिवासांपासून शेअर बाजाराची पडझड सुरू होती. अमेरिकेने जाहीर केलेल्या टॅरिफ धोरणाचा शेअर बाजारावर परिणाम होत होता. मात्र, या टॅरिफ धोरणाला 90 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे आज शेअर बाजार सावरला असून सेन्सेक्स 1000 अंकांनी वधारला, तर निफ्टी 22,500 च्या वर गेल्याचे पाहायला मिळाले.

Ajit Pawar : थोडा धीर धरा नाशिक, रायगडचा तिढा सुटेल - अजित पवार

देशाचे केंद्रीय मंत्री अमित शाह हे रायगड दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या या दौऱ्यामुळे पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. याच सर्व प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिढी लवकरच सुटेल असं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, "काळजी करू नका, नाशिक, रायगडचा पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नसला तरी कामं सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून जिल्हा नियोजनचे बजेट दिलं आहे.दोन्ही ठिकाणी निधी वाढवण्यात आला आहे. थोडासा धीर धरा, सर्व तिढा सुटेल.

Ajit Pawar : तिसरा अहवाल आल्यानंतर दीनानाथ रुग्णालयावर शासन कारवाई करेल - अजित पवार

दीनानाथ मंगेशकर रुग्णालया संदर्भातील दुसरा चौकशी अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आल्याची माहिती आहे. याबाबतचा तिसरा अहवाल आल्यानंतर दीनानाथ रुग्णालयावर शासन योग्य ती कारवाई करेल, असं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे. शिवाय उद्या अमित शहा येणार असल्यामुळे याबाबतची माहिती मी उद्या मुख्यमंत्र्यांना विचारणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

Sudhir Mungantiwar : माझं प्रमोशन होण्यासाठी हे सरकार कायम राहिलं पाहिजे : सुधीर मुनगंटीवार

नाशिकमधल्या व्याख्यानमालेत, जो या कार्यक्रमाला येतो त्यांचं प्रमोशन होतो असं आयोजक म्हणाले. त्यावर माझं प्रमोशन होण्यासाठी माझं सरकार राहिले पहिजे. उद्या आणि परवा येणारे वक्ते यांची नावं पाहिली तर त्यांचे देखील प्रमोशन होणार का? उद्या प्रणिती शिंदे आणि परवा अरविंद सावंत येणार आहेत. माझं प्रमोशन पुढे होणार असेल तर मग या दोघांना आमच्या पक्षात घ्यावे लागेल, अशी मिश्किल टिप्पणी मुनगंटीवार यांनी केली आहे.

Tahawwur Rana : तहव्वूर राणाला 18 दिवसांची NIA कोठडी

मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणाला अखेर भारतात आणण्यात आलं आहे. त्यानंतर दिल्लीच्या विशेष न्यायालयाने राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. एनआयएनं राणाची 20 दिवसांची कोठडी मागितली होती. त्यानंतर अखेर 18 दिवसांची कोठडी देण्यात आली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.