सोन्याची किंमत: दिवसेंदिवस सोन्याच्या दरात (Gold Price) वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या दरामुळं ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. दरम्यान, अक्षय्य तृतीयेच्या सनापूर्वी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. वायदा बाजारासह देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या किंमतीतही वाढ झाली आहे. MCX वर सोने सुमारे 1200 रुपयांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. दर दुसरीकडे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात 2020 रुपयांची वाढ झाली आहे.
अक्षय्यतृतीयेपूर्वी सोन्याच्या बाजारात मोठी लगबग असते. सोन्याच्या दरात जोरदार झेप आहे. फ्युचर्स मार्केट MCX वर, 10 ग्रॅम सोन्याचा भाव 12,00 रुपयांच्या वाढीसह 93224 वर व्यवहार करत आहे. 5 जून 2025 रोजी संपणाऱ्या सोन्याच्या करारामध्ये 1.29 टक्क्यांचा बदल दिसून येत आहे. त्याच वेळी, देशांतर्गत बाजारात सोने 95,400 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. देशांतर्गत बाजारात सोने खरेदी करण्यासाठी तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील ते आम्ही तुम्हाला सांगतो.
एकीकडे वायदे बाजारात सोन्याचे भाव वाढत आहेत. दुसरीकडे, देशांतर्गत बाजारात सोन्याने 95,400 रुपये प्रति 10 ग्रॅमची विक्रमी पातळी गाठली आहे. सोन्याचा भाव 2,020 रुपयांनी वाढताना दिसत आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे भाव काय आहेत याबाबतची माहिती पाहुयात.
आज दिल्लीत 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 2,020 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. राजधानीत सोन्याचा भाव 95,550 रुपयांवर आहे. त्याचवेळी देशाची आर्थिक राजधानी मुंबईबद्दल बोलायचे झाले तर तिथेही सोन्याचे भाव वाढले आहेत. मुंबईत सोने महाग झाले आहे. 24 कॅरेटचे 10 ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी तुम्हाला 95,400 रुपये मोजावे लागतील.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्येही सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. लखनऊमध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत 95,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. यासोबतच चेन्नईमध्ये सोन्याचा भाव 95,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
दिवसेंदिवस सोन्याच्या दरात मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं सोन्याची खरेदी करावी की नको असा प्रश्न ग्राहकांच्या मनात येत आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु झाला आहे. असा काळात लोक मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत असतात. मात्र, आका सातत्यानं सोन्याच्या दरात वाढ होत असल्यानं सोने खरेदीकडे ग्राहक पाठ फिरवताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..