पिंपरी, ता. ११ : आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क आणि तारांगण येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १२ व १३ एप्रिल दरम्यान हे कार्यक्रम होणार आहेत. कागदी विमान कार्यशाळा (गट १) सकाळी ११ ते दुपारी १२ वाजता होणार आहे. अंतराळ आभासी वास्तव सत्र दुपारी एक ते तीन वाजता नोंदणी केली जाणार आहे. प्रथम येणाऱ्याला प्राधान्य असणार आहे. त्यानंतर दुपारी तीन ते पाच वाजता ड्रोन उडवणे सत्र होणार आहे. दिवसा आकाश निरीक्षण (टेलिस्कोपच्या साहाय्याने) दुपारी साडेतीन ते पाच वाजता, कागदी विमान कार्यशाळा (गट २) दुपारी चार ते पाच वाजता होणार आहे, अशी माहिती सायन्स पार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार कासार यांनी दिली.
---