महाराष्ट्राच्या लेकींना कोणाचा धोका; रस्त्यांवर नेमकं काय घडतंय मुलींसोबत, तुमच्या मुली अजिबात सुरक्षित नाहीत
Saam TV April 12, 2025 06:45 AM

स्नेहील झणके, साम टीव्ही

पुणे (बारामती) : शिकण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मुलींच्या अब्रुवर हात घालणारा हा नराधम नीट नीरखून पहा. छत्रपती संभाजीनगरातील बन्सीलाल नगरमध्ये भर रस्त्यात मुलींची छेड काढली जाते. दोन दिवसापूर्वी रस्त्यावरून चालत जाणाऱ्या मुलींची टू व्हीलरवर आलेल्या मुलांनी छेड काढली. हे प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सर्रासपणे सुरु असून पोलिस मात्र ढिम्म आहेत.

या घटना इथेच थांबत नाहीत. ज्यांना ही छेडछाड सहन होत नाही. त्या सामाजिक-कौटुंबिक दबावापोटी मृत्यला कवटाळतात.तल्या तरूणीसारखं... बारामतीच्या कोऱ्हाळे खुर्द इथल्या १६ वर्षीय मुलीनं ४ गावगुंडांच्या सततच्या छेडछाडीला कंटाळून राहत्या घरी गळफास लावून आपलं जीवन संपवलंय.

आरोपीला अटक केलेली असली आणि त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई जरी झाली तरी एक निष्पाप जीव यात गेला. अशा कितीतरी तरूणी अशा नराधमांच्या तालिबानी कृत्याच्या बळी ठरत असतील. मानसिक आघात सहन करत जगत असतील. त्यामुळे आता स्त्रियांनीच अन्याय मुकाटपणे सहन न करता स्वत:ला सक्षम करायला हवं. तर पोलिस यंत्रणेनेही सुस्तपणा सोडून अब्रुवर हात घालणाऱ्या या नराधमांना वेळीच कडक शासन करायला हवं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.