IPL 2025 RR vs LSG Live Streaming : राजस्थान रॉयल्ससमोर लखनौचं आव्हान, घरच्या मैदानात कमबॅक करणार?
GH News April 19, 2025 03:07 AM

आयपीएलच्या 18 व्या मोसमात शनिवारी 19 एप्रिलला डबल हेडर अर्थात 2 सामने खेळवण्यात येणार आहेत. या डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. संजू सॅमसन राजस्थानचं नेतृत्व करणार आहे. तर ऋषभ पंत याच्याकडे लखनौच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. राजस्थान आणि लखनौ दोन्ही संघांचा हा आठवा सामना असणार आहे. दोन्ही संघांचा गेल्या सामन्यात पराभव झाला आहे. त्यामुळे आता या सामन्यातून कमबॅक करण्याचा प्रयत्न राजस्थान आणि लखनौचा असणार आहे. अशात या प्रयत्नात कोण यशस्वी ठरणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

पॉइंट्स टेबलमधील स्थिती

लखनौ सुपर जायंट्सने 7 पैकी 4 सामने जिंकले आहेत. लखनौ 8 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे. तर लखनौचा नेट रनरेट हा +0.086 असा आहे. मात्र लखनौचा गेल्या सामन्यात 14 एप्रिलला चेन्नईविरुद्ध पराभव झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला राजस्थानला 7 पैकी फक्त 2 सामनेच जिंकता आले आहेत. राजस्थानला गेली सलग 3 सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. लखनौला गेल्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे आता राजस्थानचा घरचा मैदानात लखनौला पराभूत करुन विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न असणार आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना केव्हा?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना शनिवारी 19 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना कुठे?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स लाईव्ह मॅच मोबाईलवर कुठे पाहता येणार?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स लाईव्ह मॅच जिओस्टार एपवर लाईव्ह पाहायला मिळेल.

गुजरात विरुद्ध दिल्ली सामना

दरम्यान डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने असणार आहेत. या सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.