Goa News: डिचोलीत हजरत अदुल शाह बाबाचा 'उरूस', मुस्लिम बांधवांनी शहरात काढली भव्य रॅली; वाचा गोव्यातील दिवसभरातील घडामोडी
dainikgomantak April 19, 2025 02:45 AM
डिचोलीत हजरत अदुल शाह बाबाचा 'उरूस', मुस्लिम बांधवांनी शहरात काढली भव्य रॅली

'उरूस'चा उत्साह..!

डिचोलीत हजरत अदुल शाह बाबा दरगाहच्या उरूस उत्सवाला जल्लोषात प्रारंभ. मुस्लिम बांधवांतर्फे शहरात काढली भव्य मिरवणूक. शनिवारी रंगणार 'कव्वाली'ची जुगलबंदी.

Goa Accident: केपे येथे अपघात, वाहनांची एकमेकांना धडक; जीवीतहानी टळली

केपे येथून अपघाताची घटना समोर आली आहे. तीन कार एकमेकांना धडकल्या. यामध्ये एका दुचाकीस्वाराचेही नुकसान झाले. मात्र सुदैवाने जीवीतहानी टळली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे.

कळंगुटमध्ये पर्यटकांना बेकायदेशीररित्या मसाज सेवा देणाऱ्या महिलेला ५ हजारांचा दंड, पर्यटन उपसंचालकांकडून कारवाई

कळंगुटमधील एका शॅकमध्ये पर्यटकांना बेकायदेशीररित्या मसाज सेवा देणाऱ्या माला चव्हाण (कर्नाटक) या महिलेला पर्यटन उपसंचालकांकडून ५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच, भविष्यात असे न करण्याची समज देखील देण्यात आली.

Goa Accident: पेडे जंक्शनजवळ कारवर पडला वीजेचा खांब, जीवीतहानी टळली

पेडे जंक्शनजवळ एका मालवाहू ट्रकला विजेचा तार अडकली, ज्यामुळे तिथून जाणाऱ्या कारवर विजेचा खांब पडला. यामुळे गाडीचे नुकसान झाले. मात्र या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही.

भाजप 15 वर्षापासून भंडारी समाजाचा राजकीय हेतूने वापर करतंय; अमित पालेकर

भाजप गेल्या १५ वर्षापासून भंडारी समाजाचा राजकीय हेतूने वापर करत आहे, असा आरोप आप नेते अमित पालेकर यांनी केला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भंडारी समाजाच्या नेत्यांसोबत घेतलेली बैठक समाजात फूट पाडण्यासाठीचा प्रयत्न आहे, असेही पालेकर म्हणाले.

Goa Fire: सांगोल्डा येथे व्हिलाला आग, नऊ लाखांचे नुकसान

सांगोल्डा येथे व्हिलाला आग लागून नऊ लाखांचे नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, कोणतीही जीवितहाणी झालेली नाही.

तुमचे राजकारण तुम्हाला लखलाभ! अभिनेते पोंक्षेंचे मंत्री गावडेंना प्रत्युत्तर

प्रेक्षागृहातील प्रेक्षकही काय बोलत होते ते एकदा ऐका म्हणावं. त्या साऱ्या प्रेक्षकांनी देखील सुपारी घेतली होती का? प्रेक्षकच ओरडून सांगत होते, की सगळंच आमच्या हाताबाहेर गेले आहे. मी कुणावरच वैयक्तिक आरोप केलेले नाहीत. जे सुपारी घेतात त्यांच्याच डोक्यात असले सुपारी-बिपारी वगैरे विषय येतात. मी कुणी गुंड नाही. मी कलावंत आहे. सुपारी घेऊन जे काही करायचं असेल ते तुम्ही करा, तुमचे राजकारण तुम्हाला लखलाभ! तुमच्या डोक्यातील विकृत विचार आमच्या तोंडात घालू नका.

Fatorda Crime: फातोर्डा येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, एकाला अटक

फातोर्डा येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करतायेत.

Goa Assembly Election: किरण कांदोळकर - दयानंद मांद्रेकरांचा 2027 च्या निवडणुकीवर डोळा!

किरण कांदोळर आणि दयानंद मांद्रेकरांच्या २०२७च्या निवडणूकीवर डोळा ठेऊन हालचाली सुरू. २०११ साली झालेल्या जनगणनेची ह्यांनी कोणती कारवाई केली? अशोक नाईकांचा सवाल. अशोक नाईक - देवानंद नाईक गटाने घेतली मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष नाईक यांची भेट.२०२६ मध्ये फक्त भंडारी समाजाची नको तर ओबीसींच्या सर्व १९ जातींची जनगणना करण्याची केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

Railway: उतोर्डा येथे रेल्वेच्या धडकेत मारिया दुरादो या ५९ वर्षीय महिलेचा मृत्यू

उतोर्डा येथे रेल्वेच्या धडकेत मारिया दुरादो (वय ५९, रा. गॅब्रिएल क्रूझ वाडा, उतोर्डा) या महिलेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.