RCB vs PBKS : बंगळुरुची घरच्या मैदानात पराभवाची हॅटट्रिक, पंजाब किंग्सचा 5 विकेट्सने विजय
GH News April 19, 2025 03:07 AM

पंजाब किंग्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 34 व्या सामन्यात होम टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर घरच्या मैदानात 5 विकेट्सने मात केली आहे. आरसीबीने पंजाबला विजयासाठी 14 ओव्हरमध्ये 96 धावांचं आव्हान दिलं होतं. पंजाबने हे आव्हान 12.1 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. पंजाबने 98 धावा केल्या. उभयसंघात 14 षटकांचा सामना खेळवण्यात आला. पावसामुळे सव्वा 2 तासांचा खेळ वाया गेल्याने 6-6 ओव्हर कापण्यात आल्या. तसेच पंजाबचा हा या मोसमातील पाचवा विजय ठरला. पंजाब या मोसमात 5 सामने जिंकणारी दिल्लीनंतर दुसरी टीम ठरली.

आरसीबीची बॅटिंग, टीम डेव्हीडचं अर्धशतक

पाऊस आणि ओल्या खेळपट्टीमुळे सामन्याला 9 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात झाली. त्याआधी 9 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. पंजाबने आरसीबीला बॅटिंगसाठी भाग पाडलं.आरसीबीची पंजाबच्या गोलंदाजांसमोर घरसगुंडी झाली. त्यामुळे आरसीबी 50 धावा करणार की नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. मात्र टीम डेव्हिड याने अखेरच्या क्षणी स्फोटक अर्धशतकी खेळी केली आणि आरसीबीची लाज राखली. टीम डेव्हीड याने अर्धशतक केलं. त्यामुळे आरसीबीला 14 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 95 धावा करता आल्या.

टीम डेव्हीडने 26 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 5 फोरसह नॉट आऊट 50 रन्स केल्या. कर्णधार रजत पाटीदार याने 23 धावांचं योगदान दिलं. तर या दोघांव्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. विराट कोहलीसह इतर फलंदाजांनी पंजाबच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. पंजाबकडून अर्शदीप सिंह, मार्को यान्सेन, युझवेंद्र चहल आणि हरप्रीत ब्रार या चौघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर झेव्हीयर बार्टलेट याने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.