Sitaare Jameen Par : बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या आपल्या आगामी चित्रपट 'सितारे ज़मीन पर' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच या चित्रपटातील एका खास गाण्याचं शूटिंग करण्यात आलं असून, या चित्रपटात आमिरसोबत अभिनेत्री जेनेलिया डिसोझा देखील झळकणार असल्याची बातमी समोर आली आहे. बर्याच काळानंतर जेनेलिया पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसणार असल्याने तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे गाणं एका अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी क्षणावर आधारित आहे. आणि यांच्यातील केमिस्ट्री या गाण्याच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. या गाण्याचे चित्रीकरण अत्यंत भव्य पद्धतीने करण्यात आले असून, यामध्ये मुलांशी संबंधित एक भावनिक कथा गुंफलेली आहे.
'सितारे ज़मीन पर' हा चित्रपट 2007 मध्ये आलेल्या आमिर खानच्या 'तारे ज़मीन पर' या हृदयस्पर्शी चित्रपटाचा पुढचा भाग असणार आहे. नव्या चित्रपटातही शिक्षण, मानसिक आरोग्य, आणि मुलांच्या भावविश्वावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. या वेळी आमिर खान एका प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार असून, तो विशेष मुलांना मार्गदर्शन करताना दिसेल.
या चित्रपटाच्या माध्यमातून आमिर खान पुन्हा एकदा समाजाला विचार करायला लावणारा विषय घेऊन येतो आहे. चित्रपटातील गाणी, कथा आणि अभिनय यावर भर दिला जात असून, निर्मात्यांच्या मते हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करून जाईल. 'सितारे ज़मीन पर' हा चित्रपट 2025 च्या शेवटी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.