सामाजिक घटकांना न्याय मिळवून देणार अण्णा बनसोडे यांची ग्वाही
esakal April 13, 2025 03:45 AM

पिंपरी, ता. १२ ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे समाजातील वंचित, पीडित, शोषित, कष्टकऱ्यांचे आर्थिक स्वावलंबन झाल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकणार नाही. यासाठी सामाजिक, राजकीय भागीदारीसोबतच मागास घटकांची आर्थिक प्रगती करणे गरजेचे आहे. राज्य व केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून मागासवर्गीय घटकांना जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील, अशी ग्वाही विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभाग पिंपरी चिंचवड शहर जिल्हा आयोजित विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा सत्कार व राज्यस्तरीय कार्यकर्ता संवाद मेळावा चिंचवड स्टेशन येथे पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभाग पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजय औसरमल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी विधानसभा उपाध्यक्ष बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, कार्याध्यक्ष बाळासाहेब करडक, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
फोटोः 04495

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.