जर तुमच्या दारी कार आणायची असेल तर तुम्ही टाटा आणि मारुती सुझुकीच्या कारचा पर्याय निवडू शकता. टाटा टियागो कारने यावर्षी चांगले अपडेटेड मॉडेल आणले आहे. परंतू मारुती स्विफ्टला गेल्याच वर्षी अपडेट केले आहे. टाटा टियागो आणि मारुती स्विफ्ट तिच्या चांगल्या वैशिष्ट्यांमुळे खूपच प्रसिद्ध आहे. शानदार डिझाईन, तगडे फिचर्स आणि उत्तम कामगिरीमुळे या कार ग्राहकांच्या गळ्यातील ताईत झाल्या आहेत. का ते पाहूयात..
जर तुम्ही टाटा टियागो आणि मारुती स्विफ्ट यापैकी कोणती कार घ्यायची याच्या कन्फ्युजनमध्ये आहात तर आपल्या गरजांनुसार त्याची वैशिष्ट्ये पाहून निवड करु शकता. चला तर यो दोन्ही कारची वैशिष्ट्ये पाहूयात.
मारुती स्विफ्ट बोल्ड आणि स्पोर्टी लुक असल्याने डॅशिंग कार वाटते. या कारमध्ये तुम्हाला क्रोम ग्रिल, LED DRLs, डायमंड-कट अलॉय व्हील्स आणि LED प्रोजेक्टर हेडलँपची सुविधा मिळत आहे. त्यामुळे या कारच्या डिझाईनमुळे ती खूपच स्टायलिश दिसते.
जर टाटा टियागोचा विचार करायचा झाला तर याचेही डिझाईन खूपच प्रीमियम आणि कॉम्पॅक्ट आहे. यात सिग्नेचर ट्राय-एरो ग्रिलची सुविधा आहे.या शिवाय LED DRLs, ड्युअल-टोन अलॉय व्हील्स खूपच सुंदर आहेत.
मारुती स्विफ्ट 25-26 km/lचा मायलेज देऊ शकते. टाटा टियागो सीएनजीचे मायलेज दोन प्रकारच्या ट्रांसमिशन मॅन्युअल आणि ऑटोमैटिक मध्ये मिळते. मॅन्युअल वेरिएंट 26.49 किलोमीटर प्रति किलोग्रॅमचे मायलेज देते. ऑटोमेटिक वेरिएंट 28.06 किलोमीटर प्रति किलोग्रॅमचे मायलेज देते.
मारुती स्विफ्टच्या बेस वेरिएंटची सुरुवातीची किंमत 6.49 लाख रुपये आहे.हीच्या टॉप मॉडलची किंमत 9.65 लाख रुपये आहे. मारुती स्विफ्टच्या सीएनजी वेरिएंटची किंमत 8.19 लाख रुपये आहे. तर टाटा टियागोचे बेस वेरिएंट विकत घेण्यासाठी तुम्हाला 4.99 लाख रुपये खर्च करावे लागतील. टाटा टियागोच्या टॉप मॉडलची किंमत 7.45 लाख रुपये आहे. टाटा टियागो कारचे सीएनजी वेरिएंट 5.99 लाख रुपयाला मिळते.
मारुती स्विफ्टमध्ये ज्यादा मायलेज आणि एडव्हान्स फिचर आहेत. परंतू तुम्हाला जर बजेट फ्रेंडली आणि सेफ्टी हवी तर टाटा टियागो कार हा एक चांगला ऑप्शन ठरु शकते…