सनीच्या ‘जाट’चा ‘सिकंदर’ला फटका
Marathi April 13, 2025 12:24 PM

सनी देओलचा ‘जाट’ चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाल्याने याचा मोठा फटका सलमान खानच्या ‘सिकंदर’ला बसत आहे. सिकंदर चित्रपटाने 13 व्या दिवशी केवळ 34 कोटी रुपयांचे कलेक्शन जमवले असून देशभरात आतापर्यंत एकूण कलेक्शन 108.14 कोटी रुपये झाले आहे, तर जगभरात सिकंदरने 177.5 कोटी रुपये कमावले आहे. विकेंडला सिकंदरऐवजी सनी देओलच्या ‘जाट’ला अनेकांनी पसंती दर्शवल्याने याचा फटका सिकंदर चित्रपटाला चांगला बसल्याचे दिसत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.