आयपीएलमध्ये आज दुसरा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. दिल्ली संघ यंदाच्या हंगामात अपराजित राहिला असून त्यांनी चारपैकी चारही सामने जिंकले आहेत. अशातच आजच्या सामन्यात जिंकत आपली विजयी लय कायम ठेवण्याचा दिल्लीचा प्रयत्न राहणार आहे.
दुसरीकडे मुंबईत इंडियन्सचं आतापर्यंतचं प्रदर्शन अत्यंत निराशाजनक राहिलं आहे. मुंबईने आतापर्यंत पाच सामने खेळले असून त्यांना चार सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्यांना हा सामना जिंकावा लागणार आहे.
नाणेफेक कुणी जिंकली?या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकली असून त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी दिल्लीने अंतिम ११ खेळाडूत कोणताही बदल केला नाही. तर मुंबईसुद्धा आधीच्या ११ खेळाडूसह मैदानात उतरणार आहे.
कशी आहे खेळपट्टी?हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार असून येथील खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. मात्र, या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांनाही थोडीफार मदत मिळण्याची शक्यता आहे. यंदा हंगामात अरुण जेटली स्टेडियमवरचा हा पहिलाचा सामना आहे.
कुणाचं पारडं जड?आयपीएलमध्ये दोन्ही संघानी एकमेमकांविरोधात ३५ सामने खेळले असून मुंबईने १९ तर दिल्लीने १६ सामन्यात विजय मिळवला आहे. असं असलं तरी दिल्लीच्या संघाचा सध्याचा फॉर्म बघता त्यांचा पराभव करणं मुंबईसाठी मोठ आव्हान असणार आहे.
कशी आहे प्लेइंग ११?दिल्ली कॅपिटल्स : जेक फ्रेजर-मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, कुलदीप यादव, मुकेश कुमार
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, विग्नेश पुरथुर