टिटवाळ्यात धक्कादायक घटना, पसायदान वसतीगृहात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, मुलांना बेदम मारहाण
Marathi April 13, 2025 12:24 PM

कल्याण क्राइम न्यूज: कल्याणच्या टिटवाळा जवळील खडवलीच्या खाजगी वसतिगृहातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक (Titwala Crime) अत्याचार केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. सोबतच इतर मुलांना बेदम मारहाण केल्याचेही बोललं जात आहे. जिल्हा बाल कल्याण समितीच्या पाहणी दरम्यान हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

पुढे आलेल्या माहितीनुसार, खडवलीतील पसायदान या खाजगी वसतिगृहात हा गेल्या अनेक दिवसापासून प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळ गाठत कारवाई सुरू केली असून या प्रकरणी आत्तापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. यात आश्रम शाळा चालवणारा संचालक बबन शिंदे, त्याचा मुलगा प्रसन्न शिंदे, त्याची पत्नी आशा शिंदे , शिक्षिका दर्शना पंडित आणि कामगार प्रकाश गुप्ता यांचा समावेश आहे. मात्र या घटनेने परिसरात आणि जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

वयोवृद्ध जोडप्याचे एसटी प्रवासादरम्यान 9 लाखाचे दागिने चोरीला, पोलीस ठाण्यात तक्रार

बीडहून परळी आणि परळीहून सोनपेठ येथे एसटीने प्रवास करणाऱ्या वयोवृद्ध जोडप्याचे प्रवासादरम्यान नऊ लाखाचे दागिने चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.माधुरी व त्यांचे पती सूर्यकांत परळकर हे छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या मुलीकडे गेले होते. संभाजीनगर येथून एस.टी. बसने बीडला आले. बीड येथून सोनपेठला जाण्यासाठी बीड – परळी बसने दुपारी 12. वा. बीड येथून निघून परळीला दुपारी सव्वा दोन ते आडीच वा.सुमारास बस स्थानकात आले. सोनपेठची बस गेली होती म्हणुन त्यांनी परळी बस स्थानकावर उसाचा रस घेतला व दुपारी 3 वाजताच्या सुमारास परळी – सोनपेठ बसने सोनपेठला गेले. घरी गेल्यावर बॅग तपासली असता बॅग मधील लाल पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने दिसले नाहीत.

या पर्समध्ये सहा तोळे वजन असलेले 3 लाख रूपयाची एक मोहन माळ, सहा तोळे वजन असलेले 3 लाख रुपयांचे एक सोन्याची गंठण,चार तोळे वजनाचा 2 लाख रुपयांचा एक लाल खडा असलेला नेकलेस आणि दोन तोळे वजनाची 1 लाख रुपयांची जुनी बोरमाळ असे एकुण 9 लाख रुपये  किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे फिर्यादीद म्हटले आहे.

याप्रकरणी माधुरी सुर्यकांत परळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.परळी संभाजीनगर पोलिसांना याबाबत माहिती विचारले असता त्यांनी हा गुन्हा सोनपेठ पोलीस ठाण्याकडे वर्ग केल्याची माहिती दिली.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.