'होणार सून मी ह्या घरची' मालिकेमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) सध्या भटकंती करत आहे. तिने आजवर अनेक हिट मालिका केल्या आहेत. तिच्या भूमिका खूप गाजल्या आहेत. ती टीव्हीची एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाने आणि शांत स्वभावाने तिने चाहत्यांना वेड लावले आहे. तेजश्री प्रधानने नुकतीच हिमाचलला (Himachal Pradesh ) फिरायला गेली होती.
प्रधानच्या हिमाचल प्रदेशाच्या ट्रिपचे फोटो आणि छोटे व्हिडीओ ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत होती. मात्र नुकताच तिने या ट्रिपचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त फिरताना, आनंद घेताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांती आणि समाधान पाहायला मिळत आहे. तेजश्रीने गुशैनी या ठिकाणाची सफर केली आहे.
तेजश्रीने ट्रिपच्या व्हिडीओला एक खास कॅप्शन दिलं आहे. तेजश्रीने कॅप्शनमध्ये लिहिलं की, "एक मेरी…मै जीना पूरी तरह...आनंदी आयुष्य..." तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तसेच तिने व्हिडीओला हटके गाणे देखील लावले आहे. तिने व्हिडीओला 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटातील "एक जिंदगी मेरी…मै जीना पूरी तरह..." हे गाणे दिले आहे. तिने या ट्रीपला काय केले, कुठे फिरायला गेली याची छोटी झलक व्हिडीओतून दाखवली आहे.
व्हिडीओमध्ये तेजश्री हिमाचलच्या डोंगर, पर्वत रांगा, नदी, फुलांची बागांमधून मनसोक्त फिरताना दिसत आहे. नदी किनार ती स्वतःसोबत वेळ घालवताना दिसत आहे. तेजश्री प्रधानने अलिकडेच 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका सोडली. त्यामुळे चाहते आता तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.