Sonu Kakkar : भाऊ-बहिणींमध्ये दुरावा, सोनू कक्करने नेहा अन् टोनीशी तोडले सर्व संबंध, नेमकं कारण काय?
Saam TV April 14, 2025 02:45 PM

गेल्या काही दिवसापासून गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) चांगचील चर्चेत आहे. मेलबर्नमधील तिच्या कॉन्सर्टला ती उशिरा पोहोचली होती. ज्यामुळे प्रेक्षक तिच्यावर चांगले भडकले होते. त्यानंतर ती स्टेजवर ढसाढसा रडली आणि आयोजकांवर गंभीर आरोप केला. मात्र आयोजकांनी हा आरोप खोटे असल्याचे सांगितले.

आता मात्र कक्कर एका वेगळ्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. नेहाच्या बहिणीने सोनू कक्करने (Sonu Kakkar) नेहा आणि कक्करसोबत असलेले सर्व संबंध तोडले आहे. सोनू कक्करने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पोस्टमध्ये सोनूने लिहिलं की, "तुम्हाला कळवताना दुःख होत आहे की, यापुढे मी दोन टॅलेंटेड सुपरस्टार टोनी कक्कर (Tony Kakkar) आणि नेहा कक्कर यांची बहीण नाही. भावनिक वेदनांमधून मी हा निर्णय घेतला आहे आणि आज मी खरोखरच निराश आहे"

सोनू ची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी देखील यावर कमेंट्सचा वर्षाव करत आहे. सोनू कक्करच्या या पोस्टमागचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झाले नाही आहेत. सोनू कक्कर, टोनी कक्कर आणि नेहा कक्कर ही तिन्ही भावंड उत्तम गायक आहेत. आजवर त्यांनी आपल्या आवाजाने चाहत्यांना वेड लावले आहे. त्यांनी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत.

सोनू कक्कर, टोनी कक्कर आणि नेहा कक्कर या तिघांचा बॉन्डिंग आणि प्रेम कायमच चर्चेत राहिले आहे. अनेक वेळा हे तिघं एकत्र स्पॉट होतात. प्रत्येक फॅमिली फंक्शन हे एकत्र दिसतात. सोनू कक्करच्या या पोस्टवर टोनी कक्कर आणि नेहा कक्कर यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.