पंचांग -
मंगळवार : चैत्र कृष्ण २, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्चिक, सूर्योदय ६.०७, सूर्यास्त ६.४६, चंद्रोदय रात्री ८.५६, चंद्रास्त सकाळी ७.११, भारतीय सौर चैत्र २५ शके १९४७.
दिनविशेष -
२००४ - पाकिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात २७० धावांची मॅरेथॉन खेळी करणाऱ्या राहुल द्रविडने पाचवे कसोटी द्विशतक झळकावले. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला.
२०१८ - राज्य शासनातर्फे दिला जाणारा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांना, तर चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते विजय चव्हाण आणि चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांना जाहीर.