सिंधुडग गुन्हा: कुडाळ तालुक्यातील चेंदवण नाईकवाडी येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश अंकुश बिडवलकर (35) याचे दोन वर्षापूर्वी अपहरणानंतर मारहाण करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. बिडवलकर यांना आधी नग्न करून त्याचा व्हिडीओ शूट करण्यात आला. यानंतर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत त्याची हत्या करण्यात आली. याप्रकरणी शिंदे गटाचे सिद्धेश शिरसाटसह 3 संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
मार्च 2023 मध्ये सिद्धिविनायक उर्फ प्रकाश उर्फ पक्या बिडवलकर याचे अपहरण झाले. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार केलेली नाही. मात्र, 9 एप्रिल 2025 रोजी त्यांच्या नातेवाईकांनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण केलं अशी तक्रार निवती पोलिस ठाण्यात केली. सिद्धिविनायक उर्फ प्रकाश उर्फ पक्या बिडवलकर हा कुडाळ तालुक्यातील चेंदवण नाईकवाडी येथे आपल्या मुखबधिर मावशीकडे राहत होता. सिद्धिविनायक उर्फ प्रकाश उर्फ पक्या बिडवलकर हा गोवा बनावटीची अनधिकृत दारू वाहतुकीच्या केसेस त्याच्यावर दाखल होत्या. यामुळे तो 2 डिसेंबर 2023 रोजी न्यायालयात हजर होता. त्यानंतर त्याला कोर्टात हजर राहण्यासाठी आतापर्यंत चार वेळा नोटीसा पाठवल्या तरी देखील तो न्यायालयात हजर राहिला नाही.
9 एप्रिल २०२५ रोजी मिळालेल्या तक्रारीवरून निवती पोलिस आणि कुडाळ पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली. 10 एप्रिलला या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी अटक करून कुडाळ दिवाणी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने चौघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली. त्यात पहिला आरोपी सिद्धेश शिरसाट याने त्याचं दोन वर्षांपूर्वी मार्च 2023 ला अपहरण करून त्याला मारहाण केली. त्याचा मारहाणीत मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह सातार्डा येथील जंगल भागातील स्मशानभूमीत जाळून त्याची राख आणि हाडे खोल नदीत टाकून दिल्याचं सांगितलं.
मयत सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर, आरोपी सिद्धेश शिरसाट, गणेश नार्वेकर, सर्वेश केरकर आणि अमोल शिरसाट हे पाचही जण संगनमताने गोव्यातून मोठ्या प्रमाणात गोवा बनवायची दारू आणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात वितरित करत असत. पैशाच्या देवाणघेवाणीतून मयत सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर याला अपहरण करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणी दरम्यान त्याचा मृत्यू हा आरोपी अमोल शिरसाट याच्या घरी झाला होता. त्यामुळे सिद्धेश शिरसाट याने आपल्या मागे राजकीय वलय असावं यासाठी शिंदेंच्या सेनेत पत्नीने प्रवेश केला.
सिद्धेश शिरसाटची पत्नी सध्या कुडाळ येथे शिंदे गटाची महिला प्रमुख आहे. शिंदेंची शिवसेना स्थापन झाल्यानंतर सहा महिन्याने सिद्धेश शिरसाटची पत्नी सिद्धी शिरसाट शिंदे सेनेत दाखल झाली. त्याआधी सिद्धेश शिरसाट याचे कुटुंब ठाकरेंच्या सेनेत होते. सिद्धेश शिरसाटचा थेट राजकारणाशी संबंध नाही. पत्नीमुळे तो राजकारणात आला. तर गणेश नार्वेकर, सर्वेश केरकर आणि अमोल शिरसाट यांचा कुठल्याही राजकारणाशी संबंध नाही.
या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांनी उडी घेत फेसबुकवर पोस्ट करत सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं आहे. बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था भयानक, 22 हजारासाठी सिद्धीविनायक उर्फ पक्या बिडवलकर यांना नग्न करत अमानुष मारहाण करून खून करणाऱ्या सिद्धेश शिरसाट याचा आका कोण? असा प्रश्न उपस्थित वैभव नाईक यांनी केला. सत्ताधारी आमदार व राजकीय बड्या नेत्यांचा 2 वर्षे पोलिसांच्या तपासकामावर दबाव असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
https://www.youtube.com/watch?v=etl1gp_bsjo
आणखी वाचा
अधिक पाहा..