लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी आता फक्त 500 रुपयेच मिळणार? विजय वडेट्टीवारांच्या दाव्याने खळबळ
Marathi April 15, 2025 03:46 PM

नागपूर बातम्या: राज्यात ज्यावेळी लाडकी बहीण योजना लागू केली तेव्हा सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का? असा संतप्त सवाल करत काँग्रेस नेते आणि माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ज्याला कुटुंबात आधार नाही, अशा महिलांना केंद्रासरकार 1500 देत होते, त्यांना फायदा झाला असता. पण दीड हजारात घर चालते का? असेही ते म्हणाले. आता लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी आता फक्त 500 रुपयेच  देणार्‍या सरकारची कीव येत आहे. केंद्राकडुन पैसे मिळतात म्हणून पैसे कमी करणे हे चुकीचे आहे. अशा कृप्त्या लढवणे हे देखील चुकीचे असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.

शिक्षक भरती घोटाळ्यात उल्हास नरडला बळीचा बकरा केलाय- विजय वडेट्टीवार

नागपुरातील 580 शिक्षक भरती घोटाळ्यात उल्हास नरडला बळीचा बकरा करत आहे. अंतिम निर्णय हा फाईलच्या चौकशीच्या शेवटी असतो. खालचे चोर सोडून नरडचा राजकीय बळी घेतला जात आहे. यात अनेक शाळा सत्ताधारी यांचा आणि जळवळच्या लोकांच्या आहे. संस्थाचालक यांनी मान्यता दिल्यावर उपसंचालक यांच्याकडे जातो. त्यामुळं खाली चुकीचे झाले असल्याची टीका ही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नागपूर विभागात 580 शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ते बोलत होते.

5 ते 7  वर्षात सत्ताधाऱ्यांच्या नातेवाईकांच्याच संस्था- विजय वडेट्टीवार

उल्हास नरड याने उलटपत्र देऊन चौकशीची मागणी केली. यापूर्वी कारवाई झालेला डोरलीकर कोणाचा जवळच आहे, हे आम्हाला माहीत आहे. या प्रकरणी SIT ची चौकशी करावी. विभागीय चौकशी होऊ द्या, समिती नेमा, समिती अहवाल आल्यावर कारवाई होत होती. पण इथे थेट नरडला अटक करण्यात आली आहे. मागील 5 ते 7  वर्षात सत्ताधारी यांच्या नातेवाईक यांच्या संस्था आहे, या संदर्भात SIT ची नेमणूक करा अशी मागणी करतोय. शिवाय गरज असल्यास न्यायिक चौकशी करा, अशी मागणी ही  विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

विदर्भात पाणी टंचाईची परिस्थिती अदृषूक विजय वडेट्टीवार

विदर्भात पाणी टंचाईची परिस्थिती आहे. विदर्भात वैनगंगा कोरडी पडली, यात माहिती घेतली असता 8 tmc पाणी धरणात आहे. खूप मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला विदर्भात समोर जावं लागेल. जल, नल आणि नळाची तोटी नाही. केंद्र सरकारचे पैसे नाही. सरकारने वेळ पडल्यास टँकरने कारवाई करण्याची गरज असल्याचे ही विजय वडेट्टीवार म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.