एफडी दर: ट्रम्प सरकारच्या अतिरिक्त आयात शुल्काची घोषणा होऊन आता बारा दिवस उलटले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसह मुंबई शेअर बाजारात सातत्याने पडझड सुरू असताना रिझर्व बँकेने अलीकडेच केलेल्या रेपो दर कपातीमुळे SBI, आयसीआयसीआय बँक HDFC बँक तसेच कोटक महिंद्रा अशा कित्येक बँकांनी त्यांचे FDचे दर कमी केले आहेत. 15 एप्रिल म्हणजेच आजपासून स्टेट बँकांमध्ये काही निवडक मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल करण्यात येणार आहेत. ही कपात नियमित ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिक या दोघांनाही लागू असणार आहे. इतक्या अस्थिर काळात मुदत ठेवींवरील व्याजदर कमी झाल्यानंतर अनेक चांगले गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. (Financial Investment For Senior citizens)
वरिष्ठ नागरी बचत योजना (एससीएसएस)
ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही भारत सरकारद्वारे चालवली जाते. या योजनेमध्ये साठ वर्षांवरील नागरिक गुंतवणूक करू शकतात. सध्या या योजनेत 8.2% वार्षिक व्याज दिले जाते. यामध्ये ज्येष्ठ नागरिक 30 लाख रुपयांपर्यंतचे गुंतवणूक करू शकतात आणि या गुंतवणुकीचा लॉक इन कालावधी पाच वर्षांचा आहे.
पोस्ट ऑफिस मासिक योजना (पोमिस)
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही पोस्ट ऑफिस द्वारे चालवली जाते. सध्या या योजनेवर 7.4% वार्षिक व्याज दिले जाते. ज्येष्ठ नागरिकांना एकाच खात्यात 9 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येणे या योजनेत शक्य आहे.
प्रधानमंत्री वय वंदना योजना (PMVVY)
केंद्र सरकार द्वारे चालवली जाणारी प्रधानमंत्री वय वंदना योजना ही साठ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांसाठीची एक पेन्शन योजना आहे. या योजनेमध्ये गुंतवणुकीवर 7.4% वार्षिक व्याज मिळते. गुंतवणुकीसाठी मासिक तळी मासिक किंवा वार्षिक पर्याय देखील उपलब्ध आहेत. या गुंतवणूक पर्यायात ज्येष्ठ नागरिक 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात.
डेट म्युच्युअल फंड
जर ज्येष्ठ नागरिकांनी बोंड किंवा निश्चित उत्पन्नाच्या सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक केली असेल तर त्यांच्यासाठी हा पर्याय अधिक चांगला समजला जातो. ज्येष्ठ नागरिकांना या गुंतवणुकीत वार्षिक सहा ते आठ टक्के व्याज देण्यात येते. व्याजदर बाजारातील चढ उतारांवर अवलंबून असतो. मात्र हा गुंतवणूक पर्याय मध्यम परताव्याचा आहे. यामध्ये जोक जोखीम ही मध्यम स्वरूपाचे असून बाजारातील चढ उतारांवर परतावा अवलंबून आहे.
कॉर्पोरेट मुदत ठेव
कॉर्पोरेट एफडी कॉर्पोरेट्स आणि एनबीएफसीद्वारे ही मुदत ठेव आहे. ज्यामध्ये 7.5 टक्के ते 8.5 टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. जेष्ठ नागरिकांसाठी कॉर्पोरेट एफडी बँकांच्या तुलनेत अधिक व्याजदर देणारी आहे. यात मध्यम स्वरुपाची जोखीम आहे. जर यात तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करणार असाल तर फक्त उच्च रेटींग असलेल्या AAA कंपन्यांमध्येच गुंतवणूक करा.
दिवाइंडँड पैसे देणारे स्टॉक
जेष्ठ नागरिकांना नियमित लाभांश देणाऱ्या कंपन्यांमध्येही गुंतवणूक करता येऊ शकते. ब्लू चिप कंपन्यांसारख्या कंपन्या चांगले नियमित उत्पन्न आ दीर्घकाळ वाढ होणारे उत्पन्न यातून घेता येते. या पर्यायात गुंतवणूक करण्याआधी तज्ञांचा सल्ला घ्या..
हेही वाचा:
अधिक पाहा..