Bobby Deol : बॉबी देओलनं खरेदी केली आलिशान कार, किंमत वाचून पायाखालची जमीन सरकेल
Saam TV April 17, 2025 12:45 PM

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) सध्या त्याच्या चित्रपटांमुळे चांगलाच चर्चेत आहे. 'ॲनिमल'मधील त्याच्या भूमिकेने तर चाहत्यांना वेड लावले होते. चित्रपटातील त्याचा अंदाज घायाळ करणारा होता. चित्रपटात तो खलनायकच्या भूमिकेत झळकला होता. अशात आता बॉबी देओल त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. बॉबी देओलने नुकतीच आलिशान कार खरेदी केली आहे. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

बॉबी देओलचा लूक

देओलने गाडीसोबत छान फोटोशूट देखील केले आहे. कारची खरेदी करण्यासाठी बॉबी देओल एकदम कूल लूकमध्ये गेला होता. त्याने ब्लॅक टी-शर्ट आणि ग्रे पॅन्ट परिधान केली होती. तर ब्लॅक कॅप, ब्लॅक गॉगल आणि व्हाइट रंगाचे शूज घालून त्याने एकदम क्लासी लूक केला होता.

आलिशान कारचे नाव आणि किंमत

मीडिया रिपोर्टनुसार, बॉबी देओलने स्पोर्ट एसव्ही (Range Rover Sport SV Edition) गाडी खरेदी केली आहे. ज्याची जवळपास 2.95 कोटी रुपये आहे. आलिशान कारचा रंग ब्लू मॅट फिनिश आहे.

कार कलेक्शन

बॉबी देओलकडे या व्यतिरिक्त देखील आलिशान कार आहेत. यात रेंज रोव्हर स्पोर्ट, मर्सिडीज बेंज एस क्लास यांसारख्या आलिशान कार आहेत. ज्यांची किंमत कोटींच्या घरात आहे.

बॉबी देओलचा 'कंगुवा' चित्रपटातील अभिनय देखील चाहत्यांना भुरळ घालणारा होता. हा साऊथ चित्रपट होता. त्यानंतर तो 'डाकू महाराज' चित्रपटात झळकला. 'ॲनिमल'नंतर बॉबी देओलने अनेक हिट चित्रपट केले आहे. त्याला खूप प्रसिद्धी मिळाली आहे. त्याची 'आश्रम 3 ' सीरिज देखील सुपरहिट आहे. प्रेक्षक त्याला भरभरून प्रेम देत आहेत. त्याच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.