कास : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या मूळगावी दरे (ता. महाबळेश्वर) येथे आज सायंकाळी पाचच्या सुमारास हेलिकॉप्टरमधून दाखल झाले. जिल्हा पोलिस दलाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या या अचानक दौऱ्याने नेहमीप्रमाणे चर्चांना उधाण आले असून, तर्कवितर्क लढवले जात आहेत.
यावेळी श्री. शिंदे यांचा तीन दिवसांचा खासगी दौरा असून, शुक्रवारी (ता. १८) ते एका घरगुती कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. शनिवारी (ता. १९) ग्रामदैवत जननी देवीची त्यांच्या हस्ते पूजा होणार आहे. त्यासाठी ते सपत्नीक आल्याचे सांगण्यात येते.