१ लाखाचे झाले ५ ते ६ लाख! टॉप रेटिंग असलेले ५ म्युच्युअल फंड; १० वर्षांत २१% पर्यंत वार्षिक परतावा
ET Marathi April 15, 2025 10:45 PM
Mutual Fund :म्युच्युअल फंड योजनेची श्रेणी, पोर्टफोलिओ आणि गुंतवणूक धोरण तसेच परताव्याचा ट्रॅक रेकॉर्ड लक्षात घेऊन त्याला रेटिंग दिले जाते. रेटिंग एजन्सीमार्फत ही रेटिंग ठरवली जाते. परंतू, हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, चांगले किंवा मजबूत रेटिंग असलेल्या योजनेचाच ट्रॅक रेकॉर्ड चांगला असतो असे नाही, तर कधीकधी कमी रेटिंग असलेल्या योजना देखील जास्त परतावा देतात. पण या लेखात ५ टॉप रेटेड इक्विटी म्युच्युअल फंड निवडले आहेत ज्यांनी १० वर्षात सर्वाधिक परतावा दिला आहे. त्यांचा एकरकमी परतावा २१ टक्क्यांपर्यंत होता आणि एसआयपी परतावा वार्षिक २३ टक्क्यांपर्यंत होता. निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड
  • रेटिंग: ५ स्टार
  • १० वर्षांत एकरकमी परतावा: २०.४४% वार्षिक.
  • एक वेळ गुंतवणूक: १,००,००० रुपये
  • १० वर्षात १ लाख रुपयांचे मूल्य: ६,४२,२५४.९६ रुपये (६.४२ लाख रुपये)
  • एकूण कमाई: ५,४२,२५४.९६ रुपये (५.४२ लाख रुपये)
  • १० वर्षांत एसआयपी परतावा: २२.४३% वार्षिक.
  • मासिक एसआयपी गुंतवणूक: १०,००० रुपये
  • १० वर्षांतील एकूण गुंतवणूक: १३,००,००० रुपये
  • १० वर्षांनंतर एसआयपीचे मूल्य: ४६,७९,२४० रुपये
एकूण मालमत्ता: ५५,४९१ कोटी रुपये (३१ मार्च २०२५)खर्चाचे प्रमाण: ०.७३% (३१ मार्च २०२५) क्वांट ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंडरेटिंग: ४ स्टार
  • १० वर्षांत एकरकमी परतावा: १९.६२% वार्षिक.
  • एक वेळ गुंतवणूक: १,००,००० रुपये
  • १० वर्षात १ लाख रुपयांचे मूल्य: ५,९९,८४३.५३ रुपये (सुमारे ६ लाख रुपये)
  • एकूण कमाई: ४,९९,८४३.५३ रुपये (५ लाख रुपये)
  • १० वर्षांत एसआयपी परतावा: २१.३३% वार्षिक.
  • मासिक एसआयपी गुंतवणूक: १०,००० रुपये
  • १० वर्षांतील एकूण गुंतवणूक : १३,००,००० रुपये
  • १० वर्षांनंतर एसआयपीचे मूल्य: ४३,८८,९१९ रुपये
एकूण मालमत्ता : १०,४०५ कोटी रुपये (३१ मार्च २०२५)खर्चाचे प्रमाण : ०.५०% (३१ मार्च २०२५) क्वांटम स्मॉल कॅप फंडरेटिंग: ५ स्टार
  • १० वर्षांत एकरकमी परतावा: १९.१७% वार्षिक.
  • एक वेळ गुंतवणूक: १,००,००० रुपये
  • १० वर्षात १ लाख रुपयांचे मूल्य: ५,७७,६५६.१४ रुपये (५.७८ लाख रुपये)
  • एकूण कमाई: ४,७७,६५६.१४ रुपये (४.७८ लाख रुपये)
  • १० वर्षांत एसआयपी परतावा: २३.४१% वार्षिक.
  • मासिक एसआयपी गुंतवणूक: १०,००० रुपये
  • १० वर्षांतील एकूण गुंतवणूक : १३,००,००० रुपये
  • १० वर्षांनंतर एसआयपीचे मूल्य: ४९,५७,८४९ रुपये
एकूण मालमत्ता: २४,८९३ कोटी रुपये (३१ मार्च २०२५)खर्चाचे प्रमाण: ०.६९% (३१ मार्च २०२५) एसबीआय स्मॉल कॅप फंडरेटिंग: ३ स्टार
  • १० वर्षांत एकरकमी परतावा: १८.९१% वार्षिक.
  • एक वेळ गुंतवणूक : १,००,००० रुपये
  • १० वर्षात १ लाख रुपयांचे मूल्य: ५,६५,१७६ रुपये (५.६५ लाख रुपये)
  • एकूण कमाई: ४,६५,१७६ रुपये (४.६५ लाख रुपये)
  • १० वर्षांत एसआयपी परतावा: १९.५२% वार्षिक.
  • मासिक एसआयपी गुंतवणूक: १०,००० रुपये
  • १० वर्षांतील एकूण गुंतवणूक: १३,००,००० रुपये
  • १० वर्षांनंतर एसआयपीचे मूल्य: ३९,४७,६४७ रुपये
एकूण मालमत्ता: ३०,८२९ कोटी रुपये (३१ मार्च २०२५)खर्चाचे प्रमाण: ०.७२% (३१ मार्च २०२५) पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंडरेटिंग: ५ स्टार
  • १० वर्षांत एकरकमी परतावा: १७.४३% वार्षिक.
  • एक वेळ गुंतवणूक: १,००,००० रुपये
  • १० वर्षात १ लाख रुपयांचे मूल्य: ४,९८,६४४ रुपये (५ लाख रुपये)
  • एकूण कमाई: ३,९८,६४४ रुपये (४ लाख रुपये)
  • १० वर्षांत एसआयपी परतावा: १९.३७% वार्षिक.
  • मासिक एसआयपी गुंतवणूक: १०,००० रुपये
  • १० वर्षांतील एकूण गुंतवणूक : १३,००,००० रुपये
  • १० वर्षांनंतर एसआयपीचे मूल्य: ३९,१३,९९२ रुपये
एकूण मालमत्ता: ९३,४४१ कोटी रुपये (३१ मार्च २०२५)खर्चाचे प्रमाण: ०.६३% (३१ मार्च २०२५) (स्रोत: वॅल्यू रिसर्च)
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.