सेन्सेक्स ९१,००० पर्यंत वधारण्याची शक्यता! मॉर्गन स्टॅनलीच्या विश्लेषकांनी वर्तवला अंदाज, ही क्षेत्र असतील फोकसमध्ये
Sensex Predict : दिग्गज रिसर्च फर्म मॉर्गन स्टॅनलीच्या विश्लेषकांनी डिसेंबर २०२५ पर्यंत सेन्सेक्ससाठी त्यांचे लक्ष्य १२ टक्क्यांनी कमी करून ८२,००० केले आहे. पूर्वी ते ९३,००० रुपये ठेवण्यात आले होते. तसेच, हे लक्ष्य सध्याच्या पातळीपेक्षा सुमारे ७% जास्त आहे आणि ते पूर्ण होण्याची शक्यता ५० टक्के असल्याचा अंदाज आहे.मॉर्गन स्टॅनली येथील इक्विटी रिसर्च आणि स्ट्रॅटेजिस्ट (इंडिया) प्रमुख रिधम देसाई यांनी उपासना चाचरा, बानी गंभीर आणि नयनत पारिख यांच्यासोबत संयुक्तपणे लिहिलेल्या एका अहवालात हा अंदाज मांडला आहे. हा अंदाज भारतात व्यापक (Macro) पातळीवर स्थिरता राहील या गृहीतकावर आधारित आहे. यामध्ये मजबूत राजकोषीय धोरण, खाजगी गुंतवणुकीत वाढ आणि वास्तविक विकास दर आणि व्याजदरांमधील सकारात्मक फरक यांचा समावेश आहे.याशिवाय, या अहवालामध्ये मजबूत देशांतर्गत वाढ आणि अमेरिकेतील मंदी आणि कच्च्या तेलाच्या किमती नियंत्रणात राहतील असा अंदाज आहे. विश्लेषकांनी असेही म्हटले की टॅरिफशी संबंधित बहुतेक नकारात्मक बातम्या आधीच समोर आल्या आहेत. वित्तीय, ग्राहक चक्र आणि औद्योगिक क्षेत्रांवर ओव्हरवेट मॉर्गन स्टॅनलीच्या मते, या बेसलाइन परिस्थितीमध्ये अल्पकालीन व्याजदरांमध्ये ०.५० टक्क्यांनी कपात आणि सकारात्मक तरलता वातावरणाची अपेक्षा आहे. त्यांच्या गुंतवणूक धोरणाचा एक भाग म्हणून, विश्लेषक वित्तीय सेवा, कंझ्युमर आणि औद्योगिक क्षेत्राला ओव्हरवेट रेटिंग देतात. तसेच एनर्जी, मेटल, युटिलिटी आणि हेल्थकेअर या क्षेत्राला अंडरवेट रेटिंग दिले आहे.
तेजी ट्रेंडमध्ये सेन्सेक्स ९१,००० वर पोहोचणारजर सरकारकडून जीएसटी कपात आणि शेती कायद्यांवरील प्रगती यासारख्या सुधारात्मक धोरणे अपेक्षेपेक्षा चांगली झाली, तर मॉर्गन स्टॅनलीला डिसेंबर २०२५ पर्यंत सेन्सेक्स ९१,००० च्या पातळीवर पोहोचेल अशी अपेक्षा आहे. परंतू असे होण्याची फक्त ३० टक्के त्यांनी शक्यता व्यक्त केली आहे. या परिस्थितीत उत्पन्नात वार्षिक १८ टक्के वाढ, कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने ७० डॉलर प्रति बॅरलच्या खाली राहणे, महागाई नियंत्रणात असणे आणि आरबीआयकडून पुढील दर कपातीची अपेक्षा समाविष्ट आहे. याशिवाय, जागतिक व्यापार युद्ध थंडावणे आणि टॅरिफ धोरणात सौम्यता येणे ही देखील सेन्सेक्समधील या वाढीची प्रमुख कारणे आहेत. मंदीच्या ट्रेंड, सेन्सेक्स ६३,००० पर्यंत घसरू शकतो.दुसरीकडे, जर कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलर्सच्या वर राहिल्या, महागाई आणि मॅक्रो स्थिरता वाचवण्यासाठी आरबीआयने दर वाढवले आणि मंदावलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेसारख्या आव्हानांना तोंड दिले तर सेन्सेक्स ६३,००० पर्यंत घसरू शकतो. मॉर्गन स्टॅनलीने यावर २० टक्के शक्यता व्यक्त केली आहे. या परिस्थितीत, आर्थिक वर्ष २५-२८ मध्ये सेन्सेक्सची कमाई दरवर्षी १३ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.