उधारीच्या पैशावरुन मित्रांकडून बेदम मारहाण, 35 वर्षांच्या तरुणाची हत्या, मृतदेह शौचालयात टाकला
Marathi April 16, 2025 01:36 AM

परभणी : घेतलेले पैसे परत दिले नाहीत म्हणून 35 वर्षीय तरुणाला त्याच्या काही मित्रांनी बेदम मारहाण करून त्याची हत्या केल्याची घटना परभणीत घडली. हत्या केल्यानतंर मृतदेह हा सार्वजनिक शौचालयात टाकण्यात आला. अनंता टॉम्पे असं मृत तरुणाचं नाव आहे. परभणीच्या पाथरी शहरात ही घटना घडली असून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

मानवत शहरातील बिहार गल्ली भागात राहणाऱ्या 35 वर्षीय अनंता टॉम्पे याला त्यांच्या मित्रांनी सोमवारी घरातून बोलावून नेले. त्यानंतर तो घरी परत आला नसल्याने त्याच्या पत्नीने मानवत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याचवेळी पाथरी शहरातील बाबा टॉवर परिसरात असलेल्या नगरपरिषदेच्या सार्वजनिक शौचालयात एक जण बेशुद्ध अस्वस्थेत पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

शरीरावर मारहाणीचे व्रण

पोलिसांनी त्या रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा आधीच मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले. अनंता टॉम्पे यांच्या शरीरावर बेदम मारहाण केल्याचे व्रण होते. त्यामुळे ही हत्याच असल्याचं स्पष्ट झालं. ही हत्या उधारीचे पैसे न दिल्यामुळे झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या प्रकरणात मयत अनंता टॉम्पे यांच्या पत्नी रुपाली यांच्या फिर्यादीवरून पाथरी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची पुढील तपास पाथरी पोलस करत आहेत.

ही बातमी वाचा:

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.