Maharashtra Live Updates : विधानसभा निकालानंतर पहिल्यांदाच होणार एकनाथ शिंदे अन् राज ठाकरेंची भेट!
Sarkarnama April 16, 2025 04:45 AM
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची मोदींवर टीका

मोदींनी ११ वर्षात देशाचे काय भले केले ? हिंदू-मुस्लीम, दलित-सवर्ण-ओबीसी यांच्यात द्वेष पसरवणे ही मोदींची कामागिरी ! नरेंद्र मोदी यांनी हिंदू-मुस्लीम, दलित-सवर्ण-ओबीसी यांच्यात द्वेष निर्माण करण्याचेच काम केले आहे. तीन तलाक, वक्ख बोर्ड सारखे मुद्दे उपस्थित करून मोदीजींनी मुस्लीम महिलांबद्दलची आपली खोटी तळमळ दाखवण्याचा प्रयत्न केला पण मोदींनी गेल्या ११ वर्षात एकाही मुस्लीम महिलेला आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री केले नाही. मोदींनी गेल्या ११ वर्षात एकही मुस्लीम उमेदवार दिला नाही. मोदी सरकारच्या कार्यकाळात मुस्लीम आणि दलितांवर अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यांचे लिंचिंग केले जात आहे ते रोखण्यासाठी मोदींनी काहीही केले नाही त्यामुळे त्यांच्या कोरड्या भाषणबाजीला काही अर्थ नाही. असं हर्षवर्धन सपकळा म्हणाले आहेत.

Sambhaji Bhide : संभाजी भिडे गुरुजींना रुग्णालयातून डिस्चार्ज; पोलिस अधीक्षक घुगेंनी तब्येतची केली विचासपूस

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. या घटनेनंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले आहेत. मात्र, सध्या त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे. भिडे गुरुजींचे निकटवर्तीय अनुयायी हनुमंत पवार यांची याबाबत माहिती दिली. सांगली पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी देखील या घटनेनंतर संभाजी भिडे यांची भेट घेऊन तब्येतची विचारपूस केली.

C. D. Kulthe : संघटन चळवळीतील वटवृक्ष ग. दि. कुलथे अनंतात विलीन

राज्यातील सर्व सरकारी राजपत्रित अधिकाऱ्यांची अधिकृत शिखर संघटना महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, मुख्य मार्गदर्शक, सल्लागार गणपत दिनकर कुलथे (वय 87) वृद्धापकाळाने तसेच हृदयविकाराने नेरुळ येथील राहत्या घरी निधन झालं. आज त्यांच्या कुटुंबियांच्या तसेच सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संघटना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नेरूळ येथील शांतीधाम येथे कुलथे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Cabinet meeting decision : भूसंपादन मोबदल्याच्या विलंबापोटी बँकांसाठीच्या दरापेक्षा एक टक्के अधिक दराने व्याज

भूसंपादनाचा मोबदला विलंबाने दिल्या गेल्यास आता त्या रकमेवरील व्याज एकाच दराने दिले जाईल. हा व्याज दर बँकांसाठीच्या व्याज दरापेक्षा (रेपो रेट) एक टक्क्यांनी अधिक असेल, त्याबाबतचे विधेयक आणण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

Water Management : जल व्यवस्थापनाच्या जनजागृती उपक्रमात सर्व यंत्रणांनी सक्रिय सहभाग घ्यावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Water Management

जलसाक्षरता वाढवणे, पाण्याच्या बचतीचे महत्व पटवून देणे आणि जलव्यवस्थापनाच्या शाश्वत उपाययोजना राबविण्यासाठी जलसंपदा विभागाच्यावतीने ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2025’ चा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. जल व्यवस्थापन कृती पंधरवड्यातील कार्यक्रमांमध्ये प्रत्येक पालकमंत्र्यांनी सक्रिय सहभागी घेऊन कामे करून घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.

Ayodhya Ram Temple : अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकीने खळबळ

अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल अयोध्या राम मंदिर ट्रस्ट आणि उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांच्या डीएमना आल्यानं खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री हा धमकीचा ई-मेल आला. या प्रकरणी अयोध्येच्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा ई-मेल तामिळनाडूतून आल्याची माहिती आहे.

Ladaki Bahin Scheme : महायुतीकडून लाडक्या बहिणींची फसवणूक; शरद पवार पक्षाची जोरदार टीका

राज्यातील 8 लाख महिलांना 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजने' अंतर्गत 1000 रुपये मिळत असल्याने त्यांना मिळणारा 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा 1500 रुपयांचा मासिक हप्ता कमी करून फक्त 500 रुपये देण्याचा राज्य सरकारचा निर्णय अन्यायकारक नाही का? असा सवाल राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं केला आहे. राष्ट्रवादीच्या ट्वीटरवर पोस्ट शेअर करत सरकारवर टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची ही घोर फसवणूक असल्याचे ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Nasik Poltics : दीड महिन्यात एकनाथ शिंदेंची शिवसेना 'या' महिला नेत्यानी सोडली

दीड महिन्यांपूर्वी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करणाऱ्या नाशिकच्या हेमलता पाटील यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. यामुळे नाशिकच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून सध्यातरी कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचा खुलासा हेमलता पाटील यांनी दिला आहे.

Karuna Sharma ....म्हणून धनंजय मुंडे वाल्मीक कराडच्या एन्काउंटची ऑफर देऊ शकतात : करुणा शर्मा

करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वाल्मीक कराड याच्याकडे धनंजय मुंडे यांची संपूर्ण कुंडली आहे. ती कुंडली बाहेर काढू नये म्हणून ते कराडचा एन्काउटर करण्यासाठी ऑफर देऊ शकतात, असे खळबळजनक विधान करुणा शर्मा यांनी केले आहे.

Beed Crime : बीड पुन्हा हादरलं; भाजप कार्यालयासमोरच ग्रामपंचायत सदस्यांचा खून

बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात आज किटी आडगाव (ता. माजलगाव) ग्रामपंचातयीचे सदस्य बाबूराव आगे यांचा भाजप कार्यालयासमोरच सपासप वार करून खून करण्यात आला आहे. या मुळे माजलगावसह बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Chandrakant Khaire : उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांत खैरे म्हणाले 'आता सगळं ओके झालंय'

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माझ्या वाद कुठे होता. आता सगळं ओके झालंय. दानवे हे माझ्यापेक्षा लहान आहेत, त्यामुळे गळाभेट तर केव्हाही होऊ शकते, असे विधान माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर सांगितले.

Aaditya Thackeray News : सरकारवर टीका

एसटी कर्मचाऱ्यांना ५६% च पगार दिला जात असल्याचं गेल्या आठवड्यात आपण पाहिलंच, तसंच महाराष्ट्रातल्या अनेक सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल होणार असं दिसतंय. परंतु, मंत्र्यांच्या पगारासाठी निधी आहे, मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नूतनीकरणासाठी निधी आहे, उपमुख्यमंत्री कोल्हापूरात म्हणाले तसं मंत्र्यांच्या ताफ्यातील नवीन गाड्या खरेदीसाठी निधी आहे. ह्यातून काय दिसतंय? निवडणुक आयोगाच्या कृपेने निवडून आलेलं हे सरकार जनतेचं भलं करणारं सरकार नसून, स्वतःचा स्वार्थ साधणारं सरकार आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.

Vaibhav Naik News : निलेश राणेंवर गंभीर आरोप

कुडाळमधील सिध्दीविनायक बिडवलकर यांचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वीची ही घटना आहे. त्यावरून राजकारण तापले आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी थेट निलेश राणेंवर आरोप केला आहे. आरोपी सिध्देश शिरसाटला वाचवण्याचा निलेश राणे यांचा प्रयत्न आहे. हत्या पचवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेत शिरसाटचा प्रवेश झाल्याचा आरोप नाईक यांनी केला आहे.

Cabinet Meeting : नगराध्यक्षांना बहुमताने हटवणार

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. त्यापैकी एक निर्णय म्हणजे नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या नगराध्यक्षांना बहुमताने हटवण्याच्या तरतुदींस मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरीतील स्थावर मालमत्तांच्या हस्तांतरणांसाठीच्या नियमांमध्ये बदलास मान्यता देण्यात आली आहे.

Maharashtra Politics : राज्यात आणखी एक आघाडी? हे तीन बडे नेते एकत्र

महाराष्ट्राचे राजकारणात गेल्या काही वर्षांत खूप मोठ-मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. आता राजू शेट्टी, बच्चू कडू आणि महादेव जानकर यांची एकत्रित आघाडी सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान निर्माण करणार आहे. विरोधी पक्षांची स्पेस भरून काढण्याच्या निर्धाराने हे तीन बडे नेते एकत्र येणारे आहेत. राजू शेट्टी, बच्चू कडू आणि महादेव जानकर यांच्या एकत्रित आघाडीचा पुण्यात मेळावा होणार आहे. येत्या रविवारी ‘युवा संघर्ष निर्धार परिषद २०२५’ होणार आहे. त्यात सत्ताधाऱ्यांविरोधात रणशिंग ही आघाडी फुंकणार आहे.

UBT Camp Nashik : आदित्य ठाकरे आज सायंकाळी नाशिकमध्ये

नाशिकमध्ये शिवसेना उबाठा गटाचे १६ एप्रिलला शिबीर आहे. नाशिकमधील शिबीराबाबत माहिती देताना आदित्य ठाकरे हे आजच नाशिकमध्ये सायंकाळी येणार आहेत. तर उद्धव ठाकरे हे उद्या दुपारी नाशिकला येतील. त्यांच्या उपस्थितीत शिबीराचा समारोप होईल. तर आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.

BJP : राज्यसभेत भाजपची वाढली ताकद

भाजपने अण्णा द्रमुक पक्षासोबत युती केल्याने राज्यसभेत भाजपची ताकद वाढली आहे. आणखी चार खासदार आता एनडीएमध्ये सामील झाले आहेत.

Satara : शिवरायांपेक्षा राज्यपाल मोठे नाहीत... उदयनराजे कडाडले!

राज्यपाल हे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे नाहीत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक अरबी समुद्राऐवजी राजभवनातील 40 एकर जागेत व्हावे अशी मागणी भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

Maharashtra Government : राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, नाराजीच्या चर्चांचं सावट

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. यात अनेक महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. चैत्यभुमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषण करू न दिल्याबद्दल ते नाराज असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या बैठकीला महत्व प्राप्त झालं आहे.

Tanisha Bhise Death Case : तनिषा भिसे मृत्यू प्रकरणातील आणखी एक अहवाल आज समोर येणार

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणातील आणखी एक अहवाल आज समोर येणार आहे. दीनानाथ रुग्णालयाने हलगर्जीपणा केला की नाही याचा उलगटडा यातून होण्याची शक्यता आहे.

Sanjay Ghatge joins BJP : संजय घाटगे भाजपमध्ये प्रवेश करणार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी आमदार संजय घाटगे हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या मुंबईतील कार्यालयात मंगळवारी (ता.15) दुपारी 3 वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहेत.

Tuljapur drugs case : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आज न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होणार

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आज कोर्टात दोषारोपपत्र दाखल होणार आहे. या प्रकरणी 14 आरोपी तुरूंगात आहेत. तर 21 आरोपी अद्याप फरार आहेत.

Deenanath Hospital : दीनानाथ रुग्णालयाच्या थकीत कराबाबत दोन दिवसांत सुनावणी

पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाच्या थकीत कराबाबत दोन दिवसांत सुनावणी होणार आहे. थकीत रक्कम जमा न केल्यास पुढील कारवाई अटळ असल्याचा इशारा पुणे महानगरपालिकेने दिला आहे.

Sanjay Shirsat : एकनाथ शिंदेंना रोखण्यासाठी ठाकरेंचा भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न - शिरसाट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंचा भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, भाजपने ठाकरेंना प्रवेशबंदी केली असल्याचं वक्तव्य शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलं आहे.

Mahayuti Cabinet Meeting : मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक

राज्य मंत्रिमडळाची आज महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नाराजी संदर्भातही चर्चा होण्याची शक्यता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.