IPL 2025 Punjab Kings vs Kolkata Knight Riders Marathi update : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध २४५ धावाा चोपणाऱ्या चा संघ आज घरच्याच मैदानावर १११ धावांवर ऑल आऊट झाला. सलामीवीर सोडले, तर पंजाबचे सर्व फलंदाज कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांसमोर ढेपाळले. त्यात एक फलंदाज असा आहे की ज्याला सातत्याने संधी देऊही तो माती खातोय..
KKR ने चेन्नई सुपर किंग्सपाठोपाठ पंजाब किंग्सच्या फलंदाजांना स्वस्तात माघारी पाठवले. आयपीएलच्या आजच्या सामन्यात कोलकाताच्या गोलंदाजांनी १५.३ षटकांत पंजाबला १११ धावांवर तंबूत पाठवले. श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय सर्वांना अचंबित करणारा होता. KKR चा कर्णधार अजिंक्य रहाणे, तर आम्हाला पहिली गोलंदाजीच करायची होती, असे सांगून टाकले. ते का? हे पहिल्या डावातील कामगिरीतून दिसले.
प्रियांश आर्या ( २२) व प्रभसिमरन सिंग ( ३०) यांनी सुरुवात चांगली करून दिली होती, परंतु हर्षित राणाने पॉवर प्लेमध्ये पंजाबला ३ धक्के दिले. अय्यर खातं न उघडता बाद झाला. रमणदीप सिंगने अफलातून झेल घेत, त्याला मदत केली. त्यानंतर फिरकीपटूंनी कमाल केली. वरुण चक्रवर्थी ( २-२१), व सुनील नरीन ( २-१४) यांनी पंजाबची मधळी फळी गुंडाळली. ग्लेन मॅक्सवेल आजही अपयशी ठरला. शशांक सिंग ( १८) व झेव्हियर बार्लेट ( ११)यांच्यामुळे संघ शंभरी पाह पोहोचला. वैभव अरोरा व एनरिच नॉर्खिया यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.
पंजाब किंग्सची ही आयपीएलमधील चौथी नीचांक कामगिरी ठरली. २०१७ मध्ये रायझिंग पुणे सुपर जायंट्सविरुद्ध ते ७३ धावांवर गुंडाळले गेले होते. त्यानंतर २०१५ मध्ये RCB विरुद्ध ८८ व २०१८ मध्येच RCB विरुद्ध ८८ धावांवर पंजाबचा संपूर्ण संघ तंबूत गेला होता. पण, मल्लापूर येथील ही त्यांची नीचांक धावसंख्या ठरली. मागच्या वर्षी गुजरात टायटन्सने त्यांना १४२ धावांवर गुंडाळले होते. यंदाच्या पर्वात KKR च्या गोलंदाजांचा दबदबा दिसून येतोय. आजच्या लढतीपूर्वी त्यांनी चेन्नईला ९ बाद १०३ धावांवर रोखले, SRH ला १२० धावांवर गुंडाळले होते.
पंजाबने ४.२ कोटींत ताफ्यात घेतलेल्या चे अपयश संघाची डोकेदुखी वाढवतेय. त्याला यंदाच्या आयपीएलमध्ये ०,३०,१,३, ७ अशा धावा केल्या आहेत. आज संघाला त्याची खरी गरज असताना तो कसा बाद झाला ते पाहा..