मधुमेह हा असा आजार आहे ज्यासाठी आहाराची अत्यंत काळजी घ्यावी लागते. कारण ज्या लोकांना मधुमेह हा आजार आहे त्यांना त्यांच्या आहारात थोडासा निष्काळजीपणा देखील रक्तातील सारखरेची पातळी वाढवू शकतात. त्यामुळे तज्ञ नेहमी निरोगी आहार म्हणजे कमी फॅट असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. त्यातच आपले आरोग्य चांगले राहवे यासाठी आपण दूधाचे सेवन करत असतो. कारण दुध हे शरीराला पोषक तत्वे पुरवते आणि जर दुधात इतर काही पदार्थ मिसळले तर ते आणखी पौष्टिक बनते. आता प्रश्न असा उद्भवतो की मधुमेही रुग्णांना भरपूर पोषक तत्वांची आवश्यकता असते, मग मधुमेही रुग्ण दूध पिऊ शकतात का? यामुळे अनेकजण यांच संभ्रमात आहेत, परंतु तज्ञांचे म्हणणे आहे की दुधात लैक्टोज नावाचा एक प्रकारचा कार्बोहायड्रेट असतो, जो रक्तातील साखर वाढवू शकतो. म्हणून, मधुमेहाच्या रुग्णांनी जास्त दूध पिऊ नये. जर मधुमेही रुग्णांना दूध आवडत असेल तर त्यांनी दुधात काही पदार्थ मिसळले पाहिजेत, ज्यामुळे दूध त्यांच्यासाठी चांगले राहील.
मधुमेही रूग्णांनी त्याच्या आरोग्यासाठी दूध पिणे फायदेशीर आहे की नाही हा एक मोठा प्रश्न तुमच्यासमोर उभा राहतो. या प्रश्नाचे उत्तर असे आहे की दूध मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे, परंतु जास्त प्रमाणात दूध पिणे हानिकारक असू शकते. कारण दुधात लैक्टोज असते, जे दुधात एक नैसर्गिक साखर असते.
मधुमेहाचे रुग्ण पिऊ शकतात हे दूध
दिल्लीतील वरिष्ठ डॉक्टर अजय कुमार सांगतात की जर मधुमेहाचे रुग्ण जास्त प्रमाणात दूध प्यायले तर त्याच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो. याशिवाय दुधात फॅट असते जी मधुमेहाच्या रुग्णांसाठी नुकसानदायक ठरू शकते. म्हणून, मधुमेहाच्या रुग्णांनी कमी फॅटयुक्त दूध प्यावे. सामान्य भाषेत, या दुधाला स्किम्ड दूध असेही म्हणतात.
गाईचे दूध फायदेशीर
मधुमेहाच्या रुग्णांसाठी गाईचे दूध फायदेशीर ठरू शकते. गायीच्या दुधात 2-बीटा केसीन प्रथिने असतात जी म्हशीच्या दुधाच्या तुलनेत सहज पचतात. ज्यामुळे ते एकूण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याशिवाय मधुमेहाचे रुग्ण दूधात हळद मिसळून पिऊ शकतात. हळदीमध्ये दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतात.
दुधात दालचिनी मिक्स करा
यासोबतच मधुमेहाचे रुग्ण दूधात दालचिनी टाकुनही पिऊ शकतात. दालचिनीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतात.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)