Letfover Dal Paratha Recipe: नाश्त्यासाठी रोज नवीन काय बनवायचं हा प्रश्न हमखास पडतो. त्यातच रात्रीचं वरण उरलेलं असेल, तर त्याचा उपयोग करून आपण एक चविष्ट आणि झटपट पराठा तयार करू शकतो. हा पराठा बनवायला सोपा असून चवीलाही खूप भारी लागतो. चला तर मग पाहूया ही सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी.
साहित्य- शिल्लक राहिलेलं वरण
- गव्हाचे पीठ – सुमारे १.५ कप (वरणाच्या प्रमाणानुसार समायोजन करा)
- कांदा – १ (बारीक चिरलेला)
- हिरव्या मिरच्या – १-२ (बारीक चिरलेल्या)
- कोथिंबीर – थोडीशी (बारीक चिरलेली)
- ओवा – अर्धा टीस्पून
- मीठ, , तिखट – चवीनुसार
- तूप किंवा तेल – पराठा भाजण्यासाठी
कृती- सर्वात आधी एका मोठ्या परातीत गव्हाचे पीठ घ्या. त्यात शिल्लक वरण मिसळा.
- त्यात चिरलेला कांदा, मिरच्या, कोथिंबीर, ओवा, मीठ आणि मसाले घाला.
- सर्व साहित्य एकत्र करून मऊसर पीठ मळा. जर वरण फार पातळ असेल, तर पिठाचे प्रमाण वाढवा.
- पीठ झाकून १०-१५ मिनिटांसाठी बाजूला ठेवा.
- लहान लहान गोळे करून लाटून पराठ्याचा आकार द्या.
- गरम तव्यावर पराठा दोन्ही बाजूंनी भाजा. त्यावर तूप किंवा तेल घालून कुरकुरीत आणि सोनेरी शिजवा.
- तयार पराठा दही, लोणचं किंवा सॉसबरोबर गरमागरम सर्व्ह करा.