अवघ्या १७ महिन्यांच्या बाळाला मिळणार ३.३ कोटींचा लाभांश, हा आहे प्रसिद्ध उद्योगपतीचा नातू
मुंबई : आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसने गुरुवारी (१६ एप्रिल) मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीने प्रति शेअर २२ रुपयांचा अंतिम लाभांश देण्याची घोषणा केली आहे. याचा फायदा इन्फोसिसच्या सामान्य गुंतवणूकदारांनाच होणार नाही तर प्रमोटर ग्रुपच्या सदस्यांनाही त्यातून कोट्यवधी रुपये मिळतील.इन्फोसिसचे सह संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांचे १७ महिन्यांचे नातू एकाग्रह रोहन मूर्ती यांना लाभांशातून ३.३ कोटी रुपये मिळतील. त्यांच्याकडे इन्फोसिसचे १५ लाख शेअर्स आहेत. त्यांचा कंपनीत ०.०४ टक्के हिस्सा आहे. एकाग्रह यांना त्यांचे आजोबा नारायण मूर्ती यांनी मार्च २०२४ मध्ये जेव्हा ते फक्त चार महिन्यांचे होते, ही भागीदारी भेट म्हणून दिली होती. त्यावेळी शेअर्सचे बाजार मूल्य २४० कोटी रुपये होते.
प्रमोटर कुटुंबाला किती लाभांश ?एनआर नारायण मूर्ती : ३३.३ कोटी रुपये अक्षता मूर्ती (नारायण मूर्ती यांची कन्या) : ८५.७१ कोटी रुपयेसुधा मूर्ती (नारायण मूर्ती यांच्या पत्नी) : ७६ कोटी रुपयेएकाग्र रोहन मूर्ती (नारायण मूर्ती यांचे नातू) : ३.३ कोटी रुपये
रेकॉर्ड तारीख इन्फोसिस लाभांशाची रेकॉर्ड तारीख ३० मे २०२५ आहे. याचा अर्थ असा की लाभांशाचा लाभ फक्त त्या गुंतवणूकदारांनाच मिळेल ज्यांच्या डिमॅट खात्यात इन्फोसिसचे शेअर्स ३० मे पर्यंत आहेत. लाभांश ३० जून २०२५ पर्यंत दिला जाईल.
तिमाही निकालमार्च २०२५ च्या तिमाहीत इन्फोसिसचा निव्वळ नफा ११.७५% कमी होऊन ७,०३३ कोटी रुपयांवर आला. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा ७,९६९ कोटी रुपये होता. मात्र, या कालावधीत कंपनीचे एकूण उत्पन्न ८% ने वाढून ४०,९२५ कोटी रुपये झाले, जे गेल्या वर्षी याच कालावधीत ३७,९२३ कोटी होते.